मुंबई – आज दिवसभरात अनेक महत्वाचे कार्यक्रम तसेच घडामोडी घडण्याची शक्यता आहे. काल लोकसभेत महिला आरक्षण विधेयक मांडण्यात आले आहे. यानंतर आज राज्यसभेत मांडले जाणार असून, आज या विधेयकाला मंजूरी मिळण्याची शक्यता आहे. तसेच आज दीड दिवसांच्या गणेशांचं विसर्जन होणार आहे. कोर्टात (Court) मुंबई तसेच दिल्लीत (delhi) सुनावणी पार पडणार आहे. तसेच राज्यातील काही भागात मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला असून, काही ठिकाणी यलो अलर्ट देण्यात आला आहे. जाणून घेऊया दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी…
दिवसभरातील महत्त्वाचे काय…
काल लोकसभेत महिला आरक्षण विधेयक मांडण्यात आले आहे. यानंतर आज राज्यसभेत मांडले जाणार असून, आज या विधेयकाला मंजूरी मिळण्याची शक्यता आहे. आज महिला आरक्षणावर लोकसभेत चर्चा होणार, कोणत्या पक्षांचा विरोध, कोण सोबत असणार
शरद पवार आणि प्रफुल्ल पटेल यांची राज्यसभेत भेट
महिला आरक्षणाच्या मुद्द्यावरप शरद पवार भाजपाला पाठिंबा देणार का, एनडीएच्या जवळ जाण्याच्या आणखी एक मार्ग
कोर्टात (Court) मुंबई तसेच दिल्लीत (delhi) सुनावणी पार पडणार आहे.
राज्यातील काही भागात मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला असून, काही ठिकाणी यलो अलर्ट देण्यात आला आहे.
महिला आरक्षणामुळं इंडिया आघाडीत फूट पडणार का
ऋषी पंचमीच्या निमित्तानं दगडूशेठ अथर्वशीर्ष पठण
दीड दिवसांच्या गणेशांचं विसर्जन होणार आहे
राष्ट्रवादीत फूट पडली नसल्याचा दोन्ही गटांचा दावा, भुजबळ म्हणतायेत की फक्त अध्यक्ष बदललेत, आता ६ ऑक्टोबरला सुनावणी
पडळकरांनी अजित पवारांवर केलेल्या टीकेनंतर सुप्रिया सुळेही भडकल्या.
NTA Exam Calendar 2024: वर्ष 2024 मधील महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या परीक्षांच्या संभाव्य तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत.
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज राज ठाकरेंच्या शिवतीर्थ या निवासस्थानी जाऊन गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं. देवेंद्र फडणवीस यांच्यासह त्यांच्या पत्नी अमृता फडणवीसही होत्या.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानी जावून त्यांच्या घरच्या बाप्पाचं दर्शन घेतलं. राज ठाकरे आपल्या कुटुंबासह मुकेश अंबानी यांच्या घरी बाप्पाच्या दर्शनसाठी गेले. राज ठाकरे आणि अंबानी यांच्या भेटीचा व्हिडीओ समोर आलाय.