जनसुरक्षा कायदा म्हणजे काय विधेयक महाराष्ट्र विधीमंडळात मंजूर झाले आहे (फोटो - iStock)
What is PSA : मुंबई : राज्याचे विधीमंडळ पावसाळी अधिवेशन सुरु झाले आहे. यामध्ये राज्य सरकारकडून जनसुरक्षा कायदा मंजूर करुन घेण्यात आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधीमंडळामध्ये जनसुरक्षा विधेयक सादर केले. यानंतर महाराष्ट्राच्या विधीमंडळामध्ये हे विधेयक मंजूर झाले आहे. कोणत्याही डिसेंट नोट शिवाय हे विधेयक मंजूर करण्यात आले आहे. यावरुन पूर्वी जोरदार चर्चा रंगली होती. या विरोधकांनी आक्षेप घेतल्यानंतर समिती देखील स्थापन करण्यात आली. हरकती आणि सूचना लक्षात घेत त्यानंतर योग्य ते बदल करण्यात आले. आता जनसुरक्षा विधेयक मंजूर झाले आहे. हे विधेयक मंजूर करणारे महाराष्ट्र हे देशातील पाचवे राज्य ठरले आहे.
महाराष्ट्रामध्ये जनसुरक्षा विधेयक मंजूर झाल्यानंतर ते नक्की काय आहे याबाबत माहिती जाणून घेणार आहोत. जनसुरक्षा कायदा अर्थात PSA हा एक अजामीनपात्र आणि प्रतिबंधात्मक कायदा आहे. या कायद्यानुसार, जर सरकारला वाटत असेल की, एखादी व्यक्ती सार्वजनिक सुव्यवस्थेसाठी किंवा राष्ट्रीय सुरक्षेसाठी धोका आहे, तर त्या व्यक्तीला कोणत्याही आरोपाशिवाय ताबडतोब ताब्यात घेतले जाऊ शकते. यामुळे नक्षलवादी कारवाई करणाऱ्यांवर वचक मिळवण्यास फायदेशीर ठरेल. देशातील काही नक्षलग्रस्त राज्यांमध्ये असा विशेष कायदा आधीपासूनच अस्तित्वात आहे. परंतु महाराष्ट्रात असा कायदा नसल्याने पोलीस आणि सुरक्षा यंत्रणांना UAPA सारख्या केंद्र सरकारच्या कायद्यांचा आधार घ्यावा लागतो. यानंतर आता पोलिसांना कारवाई करणे सोपे होणार आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा