मुंबई : राज्यात नुकतेच सत्तांतर झाले आहे, महाविकास आघाडी सरकार कोसळून भाजप व एकनाथ शिंदे बंडाळी गट (BJP and Shinde Group) यांचे सरकार आले आहे. आणि मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांची शपथ घेतली आहे, तर उपमुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस (Vice CM Devendra fadnvis) यांनी पदभार स्विकारला आहे. राज्यात नवे सरकार येऊन दोन दिवस होतात न होतात तोच आता विधानसभा अध्यक्षाचे वेध लागले आहेत. दरम्यान, विधानसभा अध्यक्षाची निवड सुद्धा अटीतटीची होणार आहे, कारण महाविकास आघाडीकडून शिवसेनेचे कोकणातील आमदार राजन साळवी (Shivsena MLA Rajan Salvi) यांनी उमेदवारी देण्याती आली आहे, तर भाजपाकडून आणखी एक धक्का देत पहिल्यांदाच विधानसभेत पोहचलेले ॲड. राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांना विधानसभा अध्यक्षपदाची (Speaker of the Legislative Assembly election) उमेदवारी दिली आहे. त्यामुळं विधानसभा अध्यक्षाची निवडणूक अत्यंत चुरशीची होणार आहे. त्यामुळं या दोन उमेदवारांविषयी जोरदार चर्चा सुरु आहे.
[read_also content=”एकनाथ शिंदेंना नेतेपदावरून काढणे हे चुकीचे, कायदेशीर लढाई लढू – दीपक केसरकर https://www.navarashtra.com/goa/press-conference-mla-deepak-kesarkar-at-goa-299812.html”]
दरम्यान, महाविकास आघाडीकडून विधानसभा अध्यक्षपदासाठी (Speaker of the Legislative Assembly election) कोकणातील राजापूर मतदार संघातील राजन साळवी (kokan rajapur rajan salvi) यांनी उमेदवारी दिली आहे. कट्टर शिवसैनिक अशी साळवी यांची ओळख आहे. अनेक वेळा ते आमदार म्हणून निवडून आले आहेत, तसेच उद्धव ठाकरेंचा ते अगदी जवळचे मानले जातात. विधानसभा अध्यक्ष उमेदवारीमुळं त्यांच्या नावाची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे.
जाणून घेऊया कोण आहेत राजन साळवी?
राजकीय पार्श्वभूमी