नागार्जुन यांची होणारी धाकटी सून झैनब रावदजी कोण आहे? (फोटो सौजन्य-X)
Akhil Akkineni Engaged to Zainab Ravdjee : नागा चैतन्य आणि शोभिता धुलिपाला या दक्षिणात्य कपलच्या लग्नाची सध्या सगळीकडे चर्चा आहे. नागा चैतन्य हा साऊथ सुपरस्टार नागार्जुनचा मुलगा आहे. नागा चैतन्य यांच्यानंतर आता नागार्जुनचा धाकटा मुलगा अखिल अक्किनेनीचा ही साखरपुडा पार पडला. अखिल आणि नागार्जुनने सोशल मीडियावर ही आनंदाची बातमी दिलीय. नागार्जुनने धाकटा मुलगा आणि होणारी सून जैनाब रावदजीचे रोमँटिक फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. अखिलचा हा दुसरा साखरपुडा आहे. अशा परिस्थितीत नागार्जुनची भावी धाकटी सून झैनब रावदजी कोण आहे आणि ती काय काम करते हे जाणून घेऊया…
नागार्जुन यांनी सोशल मीडियावर मुलगा अखिल आणि भावी सून जैनब रावदजी यांचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. त्याने कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘आम्ही आमचा मुलगा अखिल अक्किनेनीच्या एंगेजमेंटची घोषणा करताना फार उत्साही आहोत. आमची भावी सून जैनब रावदजी हिच्यासोबत त्याचा साखपुडा झाला आहे. जैनबचे आमच्या कुटुंबात स्वागत करताना आम्हाला खूप आनंद होत आहे. या जोडप्याचे अभिनंदन आणि आशीर्वाद.
अखिल अक्किनेनीची होणारी पत्नी ही झैनब रावदजी मुंबईतील एक कलाकार आणि कला प्रदर्शक आहे. जैनबच्या इंस्टाग्राम बायोनुसार ती एक जीवनशैली ब्लॉगर आहे जी स्किनकेअर करते. हैदराबादची स्थनिक असलेली झैनब ही मुस्लिम कुटुंबातील आहे. ती उद्योगपती झुल्फी रावदजी यांची मुलगी आणि ZR रिन्यूएबल एनर्जी प्रायव्हेट लिमिटेडचे अध्यक्ष झैन रावदजी यांची बहीण आहे.
We are thrilled to announce the engagement of our son, @AkhilAkkineni8, to our daughter in law to be Zainab Ravdjee!
We couldn’t be happier to welcome Zainab into our family. Please join us to congratulate the young couple and wish them a lifetime filled with love, joy, and… pic.twitter.com/5KM7BU00bz
— Nagarjuna Akkineni (@iamnagarjuna) November 26, 2024
अखिल अक्किनेनी आणि जैनब रावदजी यांच्या साखरपुड्यानंतर नागार्जुनने त्यांच्या लग्नाबाबत वक्तव्य केले होते. लग्नाच्या तारखा अद्याप ठरल्या नसून पुढच्या वर्षी ते लग्न करू शकतात, असे त्यांनी सांगितले. अखिल आणि झैनब काही वर्षांपासून एकमेकांना डेट करत होते. आता दोघे ही लग्न बंधनात अडकणार असल्याची अधिकृतपणे पुष्टी दिली आहे.
नाग चैतन्य आणि सोभिता हे लग्नाआधी दोन वर्षांपर्यंत एकमेकांना डेट करत होते. डेटिंगदरम्यान दोघांचे बरेच फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. मात्र त्यावेळी दोघांनी कधीच प्रेमाची जाहीर कबुली दिली नव्हती. दोघांनी थेट साखरपुड्याचे फोटो पोस्ट करत चाहत्यांना लग्नाविषयीची माहिती दिली.