Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

समृद्धी महामार्गावरील अपघाताला बसणार आळा?; नागपूर विद्यापीठाच्या प्राध्यापकांनी सुचविले ‘हे’ उपाय

नागपूरला मुंबईशी जोडून प्रवासाचा वेळ वाचविण्यासाठी समृद्धी महामार्ग (Samruddhi Highway) सेवेत दाखल झाला. मात्र, सुरुवातीपासूनच या रस्त्याला अपघाताचे ग्रहण लागले आहे. त्यामुळे हा महामार्ग मृत्यूचा महामार्ग बनत चालला आहे. समृध्दीचा प्रवास म्हटले, उरात धडकी भरत आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Jul 31, 2023 | 03:11 PM
समृद्धी महामार्गावरील अपघाताला बसणार आळा?; नागपूर विद्यापीठाच्या प्राध्यापकांनी सुचविले ‘हे’ उपाय
Follow Us
Follow Us:

नागपूर : नागपूरला मुंबईशी जोडून प्रवासाचा वेळ वाचविण्यासाठी समृद्धी महामार्ग (Samruddhi Highway) सेवेत दाखल झाला. मात्र, सुरुवातीपासूनच या रस्त्याला अपघाताचे ग्रहण लागले आहे. त्यामुळे हा महामार्ग मृत्यूचा महामार्ग बनत चालला आहे. समृध्दीचा प्रवास म्हटले, उरात धडकी भरत आहे. लोकांच्या मनातील ही भिती घालवून समृद्धीवर महामार्गावरील अपघाताला आळा बसावा आणि प्रवास सुरक्षित व्हावा, यासाठी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातले (Nagpur University) संशोधक प्रियल चौधरी, डॉ. संजय ढोबळे यांनी राज्य सरकार आणि महामार्ग विकास प्राधिकरणाला धोरणात्मक उपाययोजना सुचविल्या आहेत.

व्हिएनआयटीच्या टीमने केलेल्या संशोधनातून समृद्धीवरील अपघाताची कारणमीमांसा केली गेली. यात प्रामुख्याने संमोहन आणि वाहनाचे टायर फुटणे ही दोन प्रमुख कारणे समोर आली. सोबतच समृध्दी रस्ता सरळ आणि सिमेंटच्या शुभ्र पांढऱ्या रंगाचा फिल देतो. त्यामुळे चालक वाहन वेगाने चालविण्यास प्रवृत्त होतो. त्यामुळे, चालकाचे स्वतःचे नियंत्रण विसरुन तो संमोहित होतो व वाहनावरचा ताबा विचलित होतो. दुसरे कारण जेव्हा वाहन सरळ दिशेने 120 किलोमीटर प्रति तास वेगाने धावते तेव्हा, टायर गरम होतो. त्यामुळे चाकातील दाबामुळे टायर फुटतो. सोबतच ट्रकच्या मागे फ्लोरोसेंट टेप नसतो. ही वाहन उभी आहेत की धावत आहे, याचा अंदाज येत नाही.

अशा कराव्यात उपाययोजना…

वाहनचालकाला संमोहनापासून दूर ठेवायचे असेल त्यांनी दर 150 किलोमीटर नंतर वाहनाची वेगमर्यादा 150 प्रतितास 120 किलोमीटर करावी. पुन्हा दोन किलोमीटर नंतर 80 व 60 व नंतर 40 किलोमीटर प्रति तास असा प्रवास करावा. तशा सूचनांचे फलक दुतर्फा ठळक अक्षरांत लावावेत. वाहनाचा वेग 40 किलोमीटर / तास झाल्यानंतर अर्धा किलोमीटरवर पाणी साचवून ठेवावे.

अर्धा किलोमीटर वाहन पाण्यातून गेल्याने टायर थंड होईल. हवेचा दाब कमी झाल्याने 150 किलोमीटरपर्यंत टायर फुटणार नाही. दर 150 किलोमीटरवर प्रसाधनगृह, उपहारगृहाची सोय करावी. त्यामुळे चालक संमोहित होणार नाही. चालकाने 5-10 मिनिटे फ्रेश व्हावे व नंतर प्रत्येक 2 किलोमीटर वाहनाची गती 20 किलोमिटरने वाढवावी. महामार्गावर निःशुल्क नायट्रोजन गॅस, पंक्चर दुरुस्तीची सोय करावी. रस्त्याच्या दुतर्फा रंगीत झेंडे लावून पोलीस गस्त वाढवावी.

Web Title: Will accident stop on samruddhi highway nagpur university suggested solution nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 30, 2023 | 01:32 PM

Topics:  

  • maharashtra
  • maharashtra news
  • Nagpur
  • Road Accident
  • Samruddhi Highway

संबंधित बातम्या

खेडमध्ये पीएमआरडीए आयुक्त ॲक्शन मोडवर; विकासकामांत खो घालणाऱ्यांना थेट कायदेशीर कारवाईचा इशारा
1

खेडमध्ये पीएमआरडीए आयुक्त ॲक्शन मोडवर; विकासकामांत खो घालणाऱ्यांना थेट कायदेशीर कारवाईचा इशारा

मराठी चित्रपट महामंडळाचे आज मतदान; तब्बल 700 मतदार बजावणार मतदानाचा हक्क
2

मराठी चित्रपट महामंडळाचे आज मतदान; तब्बल 700 मतदार बजावणार मतदानाचा हक्क

Nagpur Crime: NEET विद्यार्थिनीच्या आत्महत्येनंतर नवा ट्विस्ट; सुसाईड नोटवरून पोलिसांच्याच भूमिकेवर संशय
3

Nagpur Crime: NEET विद्यार्थिनीच्या आत्महत्येनंतर नवा ट्विस्ट; सुसाईड नोटवरून पोलिसांच्याच भूमिकेवर संशय

आचारसंहिता संपल्याने विकासकामांना मिळणार वेग; पिंपरी-चिंचवड महापालिकेचा मार्ग मोकळा
4

आचारसंहिता संपल्याने विकासकामांना मिळणार वेग; पिंपरी-चिंचवड महापालिकेचा मार्ग मोकळा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.