'तो आवाज माझ्या बहिणीचा आणि…'; बिटकॉइन स्कॅमवर अजित पवारांची धक्कादायक प्रतिक्रिया
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर निवडणुकीत आर्थिक व्यवहारांसाठी बिटकॉइनचा वापर केल्याचा आरोप करण्यात आला आहे. पुण्यातील माजी पोलीस अधिकारी रवींद्र पाटील यांनी हे गंभीर आरोप लावले आहेत. भाजपचे प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनी मंगळवारी रात्री पत्रकार परिषद घेऊन पुरावे सादर केले होते, त्यानंतर राज्याच्या राजकारणात खळबळ माजली असतानाच अजित पवार यांनीही यावर धक्कादायक प्रतिक्रिया दिली आहे.
निवडणुकीसंदर्भात बातम्या वाचण्यासाठी इथे क्लिक करा
त्या ऑडिओ क्लिपमध्ये ज्या दोन लोकांचे आवाज ऐकू येतायेत. त्यांना मी ओळखतो. एक आवाज माझ्या बहिणीचा आहे. दुसरा आवाज विधानसभेतील माझ्या एका सहकाऱ्याचा आहे. या सहकाऱ्याने आमच्याबरोबर महाविकास आघाडी सरकारमध्ये काम केलं होतं. आता ते विरोधात आहेत. तसेच मधल्या काळात ते भाजपाचे खासदारही होते, असं अजित पवार यांनी म्हटलं आहे.
#WATCH | On allegations against Supriya Sule and Nana Patole, Maharashtra Deputy CM and NCP candidate from Baramati Assembly constituency, Ajit Pawar says “Whatever audio clip is being shown, I just know that I have worked with both of them. One of them is my sister and the other… pic.twitter.com/wgoEJrAFya
— ANI (@ANI) November 20, 2024
भाजपचे प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनी मंगळवारी रात्री पत्रकार परिषद घेऊन आरोप केले होते. यामध्ये कॉल रेकॉर्डिंग्स व व्हॉट्सअॅप चॅट्सचे स्क्रीनशॉट सादर करण्यात आले. ऑडिओ क्लिपमध्ये सुप्रिया सुळेंचा आवाज असल्याचा आरोप करण्यात आला होता. दरम्यान आज बारामतीमध्ये मतदान केल्यानंतर अजित पवार यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते.
बिटकॉईनसंदर्भात आरोप करण्यात आले आहे याची माहिती काल संध्याकाळी माध्यमांमधून समजली. माझ्या हातात ते व्हॉइस रेकॉर्डिंग आल्यानंतर पुण्याच्या पोलीस आयुक्तांना अर्थात अमितेश कुमार यांना फोन केला. त्यांना काही बनावट रेकॉर्डिंग फिरत आहेत आणि सायबर क्राईमकडे तक्रार करायची आहे, असं सांगितलं. त्यांनी सांगितलं तुम्ही तक्रार करा. त्यानंतर काल संध्याकाळीच ऑनलाईन तक्रार दाखल केली आहे. या सगळ्या रेकॉर्डिंग्ज आणि मेसेजेस खोटे असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
भाजपाच्या राष्ट्रीय प्रवक्त्यांविरोधात मानहानीचा दावा केल्याचंही सुप्रिया सुळेंनी सांगितलं. आज सुधांशु त्रिवेदींना मानहानीची नोटीस पाठवली आहे. त्यांनी मला पाच प्रश्न केले आहेत. त्यावर त्यांनी मला आव्हान दिलं की बाहेर येऊन उत्तर द्यावं. मी बाहेर येऊन उत्तर द्यायला कधीही तयार आहे. सुधांशु त्रिवेदी ज्या शहरात, ज्या चॅनलवर, ज्या वेळी मला बोलवतील, त्या वेळी मी जाऊन उत्तर देईन, असं आव्हान त्यांनी दिलं आहे.