Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 6 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Satara DCC Bank Election: रामराजे–शेखर गोरे भेटीने राजकीय समीकरणांना धक्का!; हॉटेलमध्ये ‘वन-टू-वन’ खलबते

Satara DCC Bank: विधान परिषदेचे माजी सभापती व ज्येष्ठ नेते रामराजे नाईक-निंबाळकर आणि शिवसेना (शिंदे गट) नेते शेखर गोरे यांची मध्यरात्री झालेली भेट साताऱ्याच्या राजकीय वर्तुळात प्रचंड चर्चेचा केंद्रबिंदू ठरली आहे.

  • By anuradha sagar
Updated On: Oct 06, 2026 | 04:31 PM
Ramraje Naik Nimbalkar, Shekhar Gore, Satara News, Satara DCC Bank

Ramraje Naik Nimbalkar, Shekhar Gore, Satara News, Satara DCC Bank

Follow Us
Follow Us:
  • रामराजे नाईक-निंबाळकर आणि शिवसेना नेते शेखर गोरे यांची हॉटेल प्रीतीमध्ये मध्यरात्री भेट
  • दोन्ही नेत्यांमध्ये सव्वा तास ‘वन-टू-वन’ गुप्त चर्चा; राजकीय वर्तुळात खळबळ
  • सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या (DCCB) निवडणुकीसाठी अंतिम पॅनेल बांधणी वेगाने सुरू
Satara DCC Bank Election  News: जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीतील राजकीय गणिते निर्णायक वळणावर असतानाच ज्येष्ठ नेते रामराजे नाईक-निंबाळकर आणि शिवसेना (शिंदे गट) नेते शेखर गोरे यांची मध्यरात्री झालेली भेट साताऱ्याच्या राजकीय वर्तुळात चर्चेचा केंद्रबिंदू ठरली आहे. हॉटेल प्रीतीमध्ये दोन्ही नेत्यांमध्ये सुमारे सव्वा तास ‘वन-टू-वन’ चर्चा झाल्याची माहिती आहे. त्यामुळे जिल्हा बँकेच्या निवडणुकीत पडद्यामागे नेमकी कोणती राजकीय जुळवाजुळव सुरू आहे, याबाबत उत्सुकता वाढली आहे.

उमेदवारी अर्जांची छाननी पूर्ण होत असताना आता पॅनेलची अंतिम बांधणी सुरू आहे. दुसरीकडे महायुतीतील जागावाटपावरून घटक पक्षांमध्ये रस्सीखेच सुरू आहे. भाजपकडून अधिक जागांसाठी आग्रह धरला जात असताना शिंदे गटासह इतर घटकांचीही राजकीय ताकद लक्षात घेऊन समीकरणे जुळवावी लागणार आहेत. अशा वेळी रामराजे–गोरे भेटीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.

Navarashtra Exclusive: ऑक्टोबरमध्येच पाण्यासाठी टाहो! पाथर्डीत हजारो फळझाडांचे भवितव्य टांगणीला

शेखर गोरे यांनी अलीकडेच उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला सोडचिठ्ठी देत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश केला. या राजकीय बदलानंतर त्यांची रामराजेंशी झालेली भेट माण-खटावच्या समीकरणांनाही नवा संदर्भ देणारी ठरू शकते. विशेष म्हणजे शेखर गोरे आणि भाजपचे मंत्री जयकुमार गोरे हे बंधू असून त्यांच्यातील राजकीय संघर्ष सर्वश्रुत आहे. त्यामुळे शेखर गोरे यांची भूमिका जिल्हा बँकेच्या निवडणुकीत कोणत्या दिशेने जाते, याकडेही लक्ष लागले आहे.

‘डाव’ नेमका कोणता?

रामराजे–गोरे चर्चेत जिल्हा बँकेतील उमेदवारी, मतदारसंघनिहाय समीकरणे आणि महायुतीतील संभाव्य ‘ॲडजेस्टमेंट’वर चर्चा झाली याबाबत अधिकृत माहिती नाही. मात्र, निवडणुकीच्या तोंडावर झालेली मध्यरात्रीची ही भेट आगामी राजकीय डावपेचांची नांदी ठरणार का, याचीच आता उत्सुकता आहे.

KDMC News: डोंबिवलीत कचऱ्याचे ढीग, कर्मचारीही गायब! उपायुक्तांच्या सरप्राईज व्हिजिटमध्ये सुमित एलको

 

Web Title: Ramraje naik nimbalkar meets shekhar gore in satara over dcc bank elections

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 06, 2026 | 04:31 PM

Topics:  

  • Maharashtra Politics
  • Nationalist Congress Party
  • Ramraje Naik Nimbalkar
  • Satara District Bank
  • Shiv Sena

संबंधित बातम्या

Pratap Sarnaik: ‘स्कॉच’ पुरस्कारानंतर मंत्री सरनाईक विरुद्ध महापालिका; SCWC प्रकल्पाच्या श्रेयावरून वादाची ठिणगी
1

Pratap Sarnaik: ‘स्कॉच’ पुरस्कारानंतर मंत्री सरनाईक विरुद्ध महापालिका; SCWC प्रकल्पाच्या श्रेयावरून वादाची ठिणगी

Ulhasnagar Political News: भाजपा-शिवसेनेचा संघर्ष चिघळला; कमलेश निकम यांच्या तक्रारीवर भाजपच्या 6 पदाधिकाऱ्यांवर गुन्हा
2

Ulhasnagar Political News: भाजपा-शिवसेनेचा संघर्ष चिघळला; कमलेश निकम यांच्या तक्रारीवर भाजपच्या 6 पदाधिकाऱ्यांवर गुन्हा

‘राज्यात मोठमोठे सोहळे आणि महोत्सवांना कात्री लावण्यात येणार’; सांस्कृतिक कार्यमंत्र्यांचा निर्णय
3

‘राज्यात मोठमोठे सोहळे आणि महोत्सवांना कात्री लावण्यात येणार’; सांस्कृतिक कार्यमंत्र्यांचा निर्णय

MPSC अध्यक्ष विवेक भिमनवार यांची गच्छंती अटळ; मुख्यमंत्र्यांचे थेट राज्यपालांना पत्र, आता चौकशी समिती…
4

MPSC अध्यक्ष विवेक भिमनवार यांची गच्छंती अटळ; मुख्यमंत्र्यांचे थेट राज्यपालांना पत्र, आता चौकशी समिती…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.