Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 8 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Maharashtra Politics: राज्यात नाट्यमय हालचाली? ‘या’ नेत्याने केली गोपीचंद पडळकरांच्या राजीनाम्याची मागणी

Sangli News: माडग्याळ येथे जिल्हा परिषद निधीतून झालेल्या कामाचे आमदार पडळकर यांनी घाईघाईने उद्घाटन केल्याचा आरोप तामनगौडा पाटील यांनी केला आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Aug 19, 2026 | 08:32 PM
Maharashtra Politics: राज्यात नाट्यमय हालचाली? 'या' नेत्याने केली गोपीचंद पडळकरांच्या राजीनाम्याची मागणी

Maharashtra Politics: राज्यात नाट्यमय हालचाली? 'या' नेत्याने केली गोपीचंद पडळकरांच्या राजीनाम्याची मागणी

Follow Us
Follow Us:
  • आमदार गोपीचंद पडळकर यांनी आमदारकीचा राजीनामा द्यावा
  • पत्रकार परिषदेत त्यांनी गोपीचंद पडळकर यांच्या कार्यपद्धतीवर टीका
  • जनावरांसाठी चारा उपलब्ध नसताना विविध मोठ्या घोषणा केल्या जात असल्याची टीका
सांगली: आमदार गोपीचंद पडळकर यांनी जतच्या विकासाबाबत केलेल्या घोषणांची पूर्तता झाली नसल्याचा आरोप करत जिल्हा परिषदेचे माजी सभापती तामनगौडा रवी पाटील यांनी त्यांच्या आमदारकीच्या राजीनाम्याची (Sangli) मागणी केली. पत्रकार परिषदेत त्यांनी पडळकर यांच्या कार्यपद्धतीवर टीका केली.

उमदी एमआयडीसीसाठी जागा व निधीची व्यवस्था नाही, तसेच तीन वेळा जाहिरात देऊनही एकही उद्योग आला नसल्याचा दावा पाटील यांनी केला. जत तालुक्यातील आठ गावे व ६६ वाड्या-वस्त्यांवर टँकरने पाणीपुरवठा सुरू असून जनावरांसाठी चारा उपलब्ध नसताना विविध मोठ्या घोषणा केल्या जात असल्याची टीकाही त्यांनी केली.

Kupwad Double Murder Case: कुपवाड दुहेरी हत्याकांड प्रकरणी गोपीचंद पडळकर आक्रमक; सांगली-कुपवाडमध्ये बंदची हाक

बांबू लागवड, जल जीवन मिशन, एमआयडीसी आणि जतला ‘देवभूमी’ करण्याच्या घोषणांमुळे रस्ते, पाणी, आरोग्य व शेतीच्या प्रश्नांमध्ये नेमका काय बदल होणार, हे पडळकर यांनी स्पष्ट करावे, अशी मागणी पाटील यांनी केली. केवळ अपयश झाकण्यासाठी घोषणा करून जनतेची दिशाभूल केली जात असल्याचा आरोप त्यांनी केला.

म्हैसाळ योजनेच्या पाण्याबाबतही पाटील यांनी प्रश्न उपस्थित करत जतच्या जनतेला पाण्यासाठी वणवण करावी लागत असल्याचे सांगितले. इतरांनी केलेल्या कामांचे श्रेय घेण्याऐवजी जाहीरनाम्यातील कामे पूर्ण करून त्यांचे उद्घाटन करावे, असे आवाहन त्यांनी केले.

विकसित होत असलेल्या जतच्या विकासाला निधीची कमतरता भासू देणार नाही – पालकमंत्री चंद्रकांत पाटील

आम्ही केलेल्या कामाचे उदघाटन, मुखमंत्र्यांकडे तक्रार

निधीच्या कामाच्या उद्घाटनावरूनही आरोप
माडग्याळ येथे जिल्हा परिषद निधीतून झालेल्या कामाचे आमदार पडळकर यांनी घाईघाईने उद्घाटन केल्याचा आरोप तामनगौडा पाटील यांनी केला. या कार्यक्रमासाठी जिल्हा परिषदेच्या कृषी व पशुसंवर्धन सभापती सावित्री रवी पाटील यांना किंवा जिल्हा परिषदेच्या कोणत्याही प्रमुख पदाधिकारी तसेच अधिकारी यांना देखील निमंत्रण देण्यात आले नव्हते , याबाबत मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्र्यांकडे तक्रार करणार असल्याचे त्यांनी सांगितले. २२ ऑगस्ट रोजी जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य तसेच पशुसंवर्धन अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत या कामाचे उद्घाटन करण्याचा कार्यक्रम असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

Web Title: Zp former leader tamangauda rvi patil demand gopichand padalkar mla resign maharashtra politics

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 19, 2026 | 08:32 PM

Topics:  

  • gopichand padalkar
  • Maharashtra Politics
  • sangli news

संबंधित बातम्या

‘5 हजार कोटींचा दावा करा, कोर्टात काय करायचं ते आम्ही पाहू’; शिवराज मोरेंना नवनाथ बन यांचं थेट आव्हान
1

‘5 हजार कोटींचा दावा करा, कोर्टात काय करायचं ते आम्ही पाहू’; शिवराज मोरेंना नवनाथ बन यांचं थेट आव्हान

ब्लास्टिंगमुळे घरांवर दगड, विहिरी कोरड्या; अवैध उत्खनना विरोधात सरपंचांचे आमरण उपोषण!
2

ब्लास्टिंगमुळे घरांवर दगड, विहिरी कोरड्या; अवैध उत्खनना विरोधात सरपंचांचे आमरण उपोषण!

Satara News: सातारा-लोणंद मार्गावर जनक्षोभ!; NHAI च्या निष्काळजीपणाविरोधात ‘सगळी गावे’ उतरणार रस्त्यावर
3

Satara News: सातारा-लोणंद मार्गावर जनक्षोभ!; NHAI च्या निष्काळजीपणाविरोधात ‘सगळी गावे’ उतरणार रस्त्यावर

Maharashtra Live Breaking News in Marathi:  काँग्रेससह विरोधी पक्षातील खासदारांचे आज पुन्हा आंदोलन
4

Maharashtra Live Breaking News in Marathi: काँग्रेससह विरोधी पक्षातील खासदारांचे आज पुन्हा आंदोलन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.