Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 19 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Maharashtra Politics: मंत्र्यांचा निर्णय बदलण्याचा मुख्यमंत्र्यांना अधिकार! महायुती सरकारच्या नव्या नियमावलीने मंत्रिमंडळात खळबळ

नव्या नियमावलीमध्ये मुख्य सचिवांच्या भूमिकेलाही अधिक महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत. एखाद्या प्रस्तावामुळे नियमांचे उल्लंघन होत असल्यास किंवा तो सरकारच्या धोरणाशी विसंगत असल्यास अंतिम निर्णयापूर्वी मुख्य सचिवांनाही मुख्यमंत्री किंवा संबंधित मंत्र्यांना त्याबाबत सल्ला देण्याचा अधिकार देण्यात आला आहे.

  • By anuradha sagar
Updated On: Aug 19, 2026 | 12:41 PM
Maharashtra News, Political News, Devendra Fadnavis, Maharashtra Cabinet

Maharashtra News, Political News, Devendra Fadnavis, Maharashtra Cabinet

Follow Us
Follow Us:
  • महायुती सरकारच्या कोणत्याही मंत्र्याने घेतलेला निर्णय बदलण्याचा मुख्यमंत्र्यांना अधिकार
  • निर्णय बदलताना किंवा स्थगित करताना मुख्यमंत्र्यांना त्याची कायदेशीर व प्रशासकीय कारणे लेखी नोंदवावी लागणार
  • ५० वर्षांहून अधिक जुन्या प्रशासकीय नियमावलीत दुरुस्ती करून २०२६ चे नवे नियम लागू
Maharashtra Rules Mahayuti Ministers Decision Power: राज्य सरकारने प्रशासकीय कामकाज अधिक केंद्रीकृत करण्याच्या दृष्टीने ‘महाराष्ट्र शासन कार्यव्यवहार नियम, २०२६’ नियामावली लागू केली आहे. या नव्या नियमावलीनुसार, राज्य सरकारमधील एखाद्या मंत्र्याने घेतलेला निर्णय बदलण्याचा किंवा रद्द करण्याचा अधिकार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देण्यात आला आहे. पण मंत्र्यांचे निर्णय बदलताना ते का बदलण्यात आले त्यामागील कारणे मुख्यमंत्र्यांना लेखी स्वरूपात नोंदवावी लागणार आहेत.

राज्य सरकारच्या या नव्या नियमांमुळे मुख्यमंत्री आणि संबंधित खात्याच्या मंत्र्यांच्या अधिकारांमध्ये महत्त्वाचे बदल झाले आहेत. संबंधित खात्याचा मंत्री हा त्या खात्याचा प्राथमिक निर्णयकर्ता असला तरी काही अपवादात्मक परिस्थितीत आणि जनहिताच्या दृष्टीने मंत्र्यांनी घेतलेला निर्णय बदलण्याचा अधिकार मुख्यमंत्र्यांना देण्यात आला आहे.

राजकीय वर्तुळात खळबळ

राज्य सरकारने या बदलामागे कोणताही राजकीय हेतू नसल्याचे सांगितले जात असले, तरी मुख्यमंत्र्यांना मंत्र्यांचे निर्णय बदलण्याचा अधिकार मिळाल्यामुळे महायुतीतील राजकीय वर्तुळातही चर्चा सुरू झाली आहे. विशेषतः एकनाथ शिंदेंच्या मंत्र्यांच्या अधिकारांवर या नियमांचा परिणाम होणार का, याबाबत तर्क-वितर्क सुरू आहेत. हे नवे नियम भारतीय संविधानाच्या कलम १६६(२) आणि १६६(३) अंतर्गत तयार करण्यात आले आहेत. त्यामुळे आगामी काळात मुख्यमंत्री, मंत्री, मुख्य सचिव आणि राज्यपाल यांच्या प्रशासकीय अधिकारांचे प्रत्यक्ष संतुलन कसे राहते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Supreme Court on CJP Protest: जंतरमंतरवरील आंदोलन, महिला, मुलींचे लैंगिक छळ…; सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय

मुंबई उच्च न्यायालयाच्या निकालानंतर महत्त्वाचा बदल

मुख्यमंत्र्यांना मंत्र्यांचा निर्णय बदलण्याचा अधिकार देण्याची ही निर्णय महत्त्वाचा मानला जात आहे. याचे कारण म्हणजे ३ मार्च २०२३ रोजी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतलेला एका भरती प्रक्रियेला स्थगिती देण्याचा निर्णय रद्द केला होता.

२३ नोव्हेंबर २०२२ रोजी चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील नोकरभरतीला तत्कालीन सहकार मंत्री अतुल सावे यांनी मंजुरी दिली होती. पण २९ नोव्हेंबरला तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या भरतीला स्थगिती दिली. या निर्णयाविरोधात बँकेने उच्च न्यायालयात धाव घेतली होती.

त्यावेळी तत्कालीन कार्यव्यवहार नियमांनुसार मुख्यमंत्र्यांना संबंधित मंत्र्याचा निर्णय बदलण्याचा अधिकार नसल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले होते. आता नव्या नियमांमध्ये त्याबाबत स्पष्ट तरतूद करण्यात आली आहे.

देवेंद्र फडणवीस केंद्रात जाणार? अमृता फडणवीस म्हणाल्या, ‘फडणवीसांना महाराष्ट्रातच सेवा करू द्या, दिल्लीत का पाठवताय?’

मुख्यमंत्र्यांना आणखी कोणते अधिकार?

राज्य सरकारच्या नव्या नियमांनुसार मुख्यमंत्र्यांना विविध विभागांकडून थेट कागदपत्रे आणि माहिती मागवण्याचे अधिकार देण्यात आले आहेत. यानुसार, संबंधित मंत्री आणि सचिवांना ही कागदपत्रे सादर करणे बंधनकारक असणार आहे. तसेच, मुख्य सचिवांनाही कोणत्याही विभागाकडून कागदपत्रे मागवण्याचा अधिकार देण्यात आला आहे.

तसेच मुख्यमंत्री एखादे प्रकरण थेट मंत्रिमंडळासमोर मांडण्याचे निर्देश देऊ शकतात. नियमांमध्ये एखाद्या विषयाचा स्वतंत्र उल्लेख नसला तरी, विशेष परिस्थितीत किंवा त्या विषयाला विशेष महत्त्व असल्यास तो विषय मंत्रिमंडळासमोर आणता येणार आहे.

मंत्रिमंडळाची बैठक न घेताही निर्णय शक्य

नव्या नियमांमध्ये मंत्रिमंडळाच्या निर्णयप्रक्रियेतही बदल करण्यात आला आहे. काही प्रकरणांमध्ये प्रत्यक्ष मंत्रिमंडळाची बैठक न घेता मंत्र्यांच्या अभिप्रायाच्या आधारे निर्णय घेता येणार आहे.

विशेष म्हणजे, तातडीच्या प्रकरणात मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या मुदतीत संबंधित मंत्र्याने आपला अभिप्राय दिला नाही, तर त्या प्रस्तावाला संबंधित मंत्र्याची मंजुरी मिळाल्याचे गृहीत धरले जाऊ शकते.

मुख्य सचिवांची भूमिका वाढली

नव्या नियमावलीमध्ये मुख्य सचिवांच्या भूमिकेलाही अधिक महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत. एखाद्या प्रस्तावामुळे नियमांचे उल्लंघन होत असल्यास किंवा तो सरकारच्या धोरणाशी विसंगत असल्यास अंतिम निर्णयापूर्वी मुख्य सचिवांनाही मुख्यमंत्री किंवा संबंधित मंत्र्यांना त्याबाबत सल्ला देण्याचा अधिकार देण्यात आला आहे.

यासोबतच मंत्रिमंडळासमोर जाणारे प्रस्ताव मुख्य सचिवांच्या माध्यमातूनच पाठवले जातील. एका निर्णयाचा संबंध एकापेक्षा अधिक विभागांशी असल्यास संबंधित सर्व विभागांशी सल्लामसलत करणेही बंधनकारक असेल.

Delhi Police on CJP Protest: संसद मोर्चा बेकायदेशीर; जंतरमंतर लाठीचार्जबाबत दिल्ली पोलिसांचे सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र

आर्थिक निर्णयांसाठी वित्त विभागाची मंजुरी

सरकारी महसुलातील सवलती, सरकारी खर्च, जमीन वाटप किंवा भाडेपट्टे, नवीन पदांची निर्मिती, वेतन-भत्ते आणि अन्य आर्थिक परिणाम असलेल्या निर्णयांसाठी साधारणपणे वित्त विभागाची पूर्वसंमती आवश्यक असेल.

राज्यपालांसमोर २२ प्रकारची प्रकरणे मांडावी लागणार

नव्या नियमांमध्ये राज्यपालांच्या भूमिकेबाबतही काही तरतुदी करण्यात आल्या आहेत. या नुसार,  सरकारकडून आदेश जारी करण्यापूर्वी २२ प्रकारची महत्त्वाची प्रकरणे राज्यपालांसमोर सादर करावी लागणार आहेत.

यामध्ये राज्यातील कायदा-सुव्यवस्था, केंद्र-राज्य संबंध, अध्यादेश, विधानमंडळातील नामनिर्देशन, विधानसभा बोलावणे किंवा विसर्जित करणे यांसारख्या बाबींचा समावेश आहे. तसेच महाराष्ट्र लोकसेवा आयोगातील नियुक्त्या, अनुसूचित क्षेत्रांशी संबंधित विषय आणि अनुसूचित जाती-जमाती, ओबीसी व अल्पसंख्याकांशी संबंधित काही महत्त्वाच्या बाबीही राज्यपालांसमोर मांडाव्या लागतील.

 

 

Web Title: Cm devendra fadnavis maharashtra rules mahayuti ministers decision power

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 19, 2026 | 12:39 PM

Topics:  

  • devendra fadnavis
  • Maharashtra Cabinet
  • Maharashtra Politics
  • political news

संबंधित बातम्या

Maharashtra Breaking News Today 2026: जंतरमंतरवरील आंदोलन प्रकरणी सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
1

Maharashtra Breaking News Today 2026: जंतरमंतरवरील आंदोलन प्रकरणी सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय

‘मी महाराष्ट्रातच राहणार, रिकामटेकड्यांना आनंद घेऊ द्या’; दिल्लीवारीच्या चर्चेवर फडणवीसांचा विरोधकांना टोला
2

‘मी महाराष्ट्रातच राहणार, रिकामटेकड्यांना आनंद घेऊ द्या’; दिल्लीवारीच्या चर्चेवर फडणवीसांचा विरोधकांना टोला

Eknath Shinde Marathi Speech:मराठी ही सक्तीची नव्हे भक्तीची भाषा; एकनाथ शिंदेंचे विधान
3

Eknath Shinde Marathi Speech:मराठी ही सक्तीची नव्हे भक्तीची भाषा; एकनाथ शिंदेंचे विधान

Maharashtra Breaking News Today 2026: शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हावर आज सर्वोच्च न्यायालयात पुन्हा सुनावणी
4

Maharashtra Breaking News Today 2026: शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हावर आज सर्वोच्च न्यायालयात पुन्हा सुनावणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.