अभिनेता आमिर खानची मुलगी इरा खान (Ira Khan) सोशल मीडियावर चांगलीच अॅक्टीव्ह आहे. ती नेहमी तिचे फोटो शेयर करत असते. मागच्या वर्षी इराने बॅायफ्रेंड नुपूर शिखरे सोबत एंगेजमेंट केली. आता लवकर आमिर खानची ही लेक लग्नबंधनात अडकणार आहे. त्यांचे प्रिवेडींग फक्शन सुरू झाल्याचं दिसत आहे. इराने इन्स्टाग्राम फोटो शेयर केले आहेत ज्यामध्ये अगदी मराठमोठ्या पद्धतीने तीचं केळवण झाल्याचं दिसत आहे.
[read_also content=”मार्क झुकरबर्क रुग्णालयात दाखल; पायाला दुखापत, मार्शल आर्टची प्रॅक्टिस करताना दुर्घटना! https://www.navarashtra.com/world/mark-zuckerberg-undergoes-surgery-for-knee-injury-during-martial-arts-training-nrps-477628.html”]
महाराष्ट्रात लग्न ठरलेल्या मुली मुलीला नातेवाईक, मित्रपारिवारांकडे जेवणाचं खास आमंत्रण दिलं जातं. याला केळवण असं म्हणतात. इराचं लग्न माहाराष्ट्रीय कुटुंबात होत असल्याने इरा खान आणि नुपूरच्या लग्नाच्या कार्यक्रमांची सुरुवात केळवण सोहळ्याने झाली. नुपूरच्या घरी दोघांचही केळवण करण्यात आलं. यावेळी इरा महाराष्ट्रीय लूकमध्ये दिसली, यावेळी इराने गुलाबी-पांढरी लहरिया साडी नेसली होती. तर नुपुरने कुर्ता पिरधान केला होता. इराने नाकात नथ आणि पांरपारिक लूक केला होता. यावेळी इराने खास मराठीत उखाणा घेतला. या सोहळ्याचे फोटो सध्या सोशल मिडियावर व्हायरल होत आहे.
इराने 18 नोव्हेंबर 2022 रोजी तिचा बॉयफ्रेंड नुपूर शिखरेसोबत एंगेजमेंट केली होती. मिडिया रिपोर्टनुसार, इरा आणि नुपूर 3 जानेवारी 2024 रोजी कोर्ट मॅरेज करणार आहेत. यानंतर ते उदयपूरला डेस्टिनेशन वेडिंग करणार आहेत. त्यानंतर आमिर खान 13 जानेवारीला मुंबईत आपल्या मुलीच्या लग्नाचे भव्य रिसेप्शन देणार आहेत. आता केळवणानंतर दोघांच्या लग्नाच्या तयारीला सुरुवात झाली असल्याचे दिसतेय.