पॅरिस : अशोक राणे यांच्या आठव्या डाॅक्युमेंटरीच्या ‘आणखी एक मोहेंजो दारो’च्या पोस्टरचं आज कान्स फिल्म फेस्टिव्हलध्ये अनावरण झालं. गिरणगावावरची ही अडीच तासांची डाॅक्युमेंटरी आहे. पोस्टर डिझाईन आणि अक्षरलेखन अच्युत पालव यांचं आहे.
संकल्पना, संशोधन, पटकथा, दिग्दर्शन अशोक राणे यांचे आहे. संशोधन आणि पटकथा या आघाडीवर अनुक्रमे नितिन साळुंखे आणि जयंत पवार यांची महत्त्वाची भूमिका आहे. गायत्री आणि राजेश पेडणेकर हे या डाॅक्युमेंटरीचे प्रमुख निर्माते आहेत.






