PBKS Vs LSG Live Streaming (फोटो- ट्विटर)
पंजाब किंग्जचा प्रथम गोलंदाजीचा निर्णय
अर्शीन कुलकर्णी शून्यावर आउट
एलएसजीने अखेरच्या सामन्यात अर्जुन तेंडुलकरला उतरवले मैदानात
Tata IPL 2026 PBKS VS LSG Live Updates: सध्या लखनौच्या एकाना स्टेडियमवर लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध पंजाब किंग्जमध्ये महत्वाचा सामना सुरू आहे. पंजाब किंग्जसाठी आजचा सामना अत्यंत महत्वाचा आहे. श्रेयस अय्यरने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. अझमतुल्ला उमरझाईने चांगली गोलंदाजी केली. शेवटच्या सामन्यात एलएसजीने अर्जुन तेंडुलकरला खेळण्याची संधि दिल्याचे पाहायला मिळाले. अखेर (IPL 2026) एलएसजीने प्रथम फलंदाजी करताना 196 रन्स केल्या आहेत. आता प्ले ऑफचे तिकीट मिळवण्यासाठी पंजाब किंग्जला 197 रन्सची गरज असणार आहे.
एलएसजीची फलंदाजी
लखनौच्या संघाकडून जोश इंग्लिस आणि अर्शीन कुलकर्णीने डावाची सुरुवात केली. मात्र अर्शीन कुलकर्णी आज चांगली खेळी करू शकला नाही. तो शून्यावर आउट झाला. त्यानंतर निकोलस पूरन 2 रन्स करून आउट झाला. त्यानंतर आयुष बडोनी चांगली खेळी करत होता. त्याने एलएसजीचा डाव सावरला. मात्र तो 43 रन्स करून आउट झाला. पटापट विकेट पडल्यामुळे संघाला सावरण्यासाठी कर्णधार ऋषभ पंत मैदानात उतरला. कर्णधार ऋषभ पंतने 26 रन्सची खेळी केली. सामना एकतर्फी जिंकवणारा मुकुल चौधरी 1 रन करून आउट झाला.
IPL 2026: Qualifier-1मध्ये RCB vs GT; फायनलचे तिकीट कोणाला? हैदराबाद अद्याप वेटिंगवर
पंजाब किंग्जची गोलंदाजी
पंजाबच्या गोलंदाजांना सुरुवातीच्या काही ओव्हर्समध्ये चांगले यश मिळवले. अझमतुल्ला उमरझाईने चांगली भेदक गोलंदाजी करत अर्शीन कुलकर्णीला शून्यावर आउट केले. तर मार्को जानसेनने निकोलस पूरनची विकेट पटकावली. स्पिनर्सने देखील चांगली गोलंदाजी केली. युझवेंद्र चहलने आयुष बडोनीला आउट केले. चहलने कर्णधार ऋषभ पंतला आउट केले. मार्को जानसेनने मुकुल चौधरीला आउट केले.
Another half-century for Josh Inglis 👏 Third fifty in five innings after a late entry into the season 🔥 Updates ▶️ https://t.co/2ADKr4dqhi#TATAIPL | #KhelBindaas | #LSGvPBKS pic.twitter.com/cPYgWQy3Kg — IndianPremierLeague (@IPL) May 23, 2026
पंजाब किंग्स : प्रियांश आर्य, प्रभसिमरन सिंग (विकेटकीपर) कूपर कोनोली, श्रेयस अय्यर (कर्णधार), सूर्यांश शेडगे, मार्कस स्टॉइनिस, शशांक सिंग, अजमतुल्ला उमरझाई, हरप्रीत ब्रार, लॉकी फर्ग्युसन, अर्शदीप सिंग.
IPL 2026: Qualifier-1मध्ये RCB vs GT; फायनलचे तिकीट कोणाला? हैदराबाद अद्याप वेटिंगवर
लखनौ सुपर जायंट्स : मिचेल मार्श, जोश इंग्लिस, निकोलस पूरन, ऋषभ पंत (कर्णधार आणि विकेटकीपर) अब्दुल समद, आयुष बडोनी, शाहबाज अहमद, मोहसीन खान, मयंक यादव, आकाश सिंग, प्रिन्स यादव






