पुणे शहरात पावसाची हजेरी (फोटो- सोशल मिडिया)
पुण्यात पाहायला मिळाला हवामानाचा लपंडाव
पुणे शहरात कडक उन्हानंतर पावसाची हजेरी
कमाल तापमानात सुमारे दोन अंश सेल्सिअसने घट
पुणे: पुणे शहरात गेल्या काही दिवसांपासून हवामानाचा लपंडाव सुरू असून कमाल आणि किमान तापमानात सातत्याने चढ-उतार होत आहेत. त्यामुळे पुणेकरांना एका दिवसात कडक ऊन, ढगाळ वातावरण आणि तुरळक पावसाचा अनुभव येत आहे. गेल्या दोन दिवसांत कमाल तापमानात सुमारे दोन अंश सेल्सिअसने घट झाली असून शुक्रवारी काही भागांत हलक्या पावसानेही हजेरी लावली.
शनिवारी शहरातील कमाल तापमान ३७ अंश सेल्सिअस, तर किमान तापमान २२.३ अंश सेल्सिअस इतके नोंदविण्यात आले. सकाळपासून निरभ्र आकाश आणि तीव्र उन्हामुळे नागरिक उकाड्याने हैराण झाले होते. दुपारनंतर मात्र वातावरणात अचानक बदल झाला. सायंकाळी आकाश ढगाळ झाले आणि शहरातील काही भागांत हलक्या पावसाच्या सरी कोसळल्या. त्यामुळे वातावरणात काहीसा गारवा निर्माण झाला.
भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या अंदाजानुसार, रविवारी तापमानात किंचित वाढ होण्याची शक्यता आहे. कमाल तापमान ३८ अंश सेल्सिअसपर्यंत जाण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. दुपारनंतर आणि सायंकाळी आकाश अंशतः ढगाळ राहू शकते. सोमवार आणि मंगळवारीही तापमानात फारसा बदल होणार नसल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे.
खंडाळ्यात मान्सूनपूर्व पावसाचे तांडव
खंडाळा तालुक्याच्या पश्चिम भागात मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली. वादळी वारे, विजेच्या कडकडाटासह कण्हेरीच्या डोंगरावर ढगफुटी सदृश्य पावसामुळे ओढ्यांना पूर आले. तासभर झालेल्य पावसाने वीटभट्टी मालकांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले असून, अतीट येथे वीज पडून एका गायीचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.
PBKS Vs LSG Live: जोश इंग्लिसने खडतर केला पंजाबचा प्ले ऑफचा मार्ग? ‘किंग्ज’ला 197 रन्सचे टार्गेट
शुक्रवारी या परिसरात नागरिकांना उकाडा असाह्य झाला होता.अकरा वाजण्याच्या सुमारास ढगाळ वातावरण होण्यास सुरुवात झाली. तर दुपारी दिड वाजता पावसाला सुरुवात झाली. मांढरदेव परिसरात अचानक वादळी वाऱ्यासह विजेचा कडकडाट आणि मेघगर्जेनेसह कण्हेरी गावच्या डोंगरावर मुसळधार पावसाने हजेरी लावली. डोंगर माथ्यावरून नाले खळाळू लागले. त्यामुळे क्षणातच ओढे दुथडी भरून वाहु लागले. अचानक आलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांची त्रेधातिरपीट उडाली. कण्हेरी परिसरातील विटभट्टीवर तयार केलेल्या कच्च्या विटांवरील झाकलेले कागद वादळी वाऱ्याने उडून गेल्याने तयार विटा भिजून सुमारे पंधरा लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला.






