सध्या सर्वत्र लग्नसराईचे दिवस सुरु आहेत. इंडस्ट्रीमध्येही अनेक सेलिब्रिटी लग्नबंधनात अडकताना दिसत आहेत. अशातच आणखी एका कपलचं लग्न झालं आहे. 'सारं काही तिच्यासाठी' फेम अभिनेता अभिषेक गांवकरने त्याची गर्लफ्रेंड सोशल मीडिया स्टार सोनालीसोबत सात फेरे घेतले आहेत.
Abhishek And Sonal Wedding Photos

सध्या सर्वत्र लग्नसराईचे दिवस सुरु आहेत. इंडस्ट्रीमध्येही अनेक सेलिब्रिटी लग्नबंधनात अडकताना दिसत आहेत. अशातच आणखी एका कपलचं लग्न झालं आहे. अभिनेता अभिषेक गांवकर आणि त्याची गर्लफ्रेंड सोनाली गुरव लग्नबंधनात अडकले आहेत.

'सारं काही तिच्यासाठी' फेम अभिनेता अभिषेक गांवकरने त्याची गर्लफ्रेंड सोशल मीडिया स्टार सोनालीसोबत सात फेरे घेतले आहेत. लग्नबंधनात अडकल्यानंतर ह्या कपलच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.

गेल्या बऱ्याच दिवसांपासून त्यांच्या लग्नाची चर्चा सुरु आहे. अखेर दोघंही विवाहबद्ध झाले असून सोशल मीडियावर चाहते शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत. या खास सोहळ्यासाठी अभिषेकने आणि सोनालीने पारंपारिक पेहराव केला होता. या लूकमध्ये दोघेही खूपच सुंदर दिसत आहेत.

सप्तपदी घेताना सोनालीने पिवळ्या रंगाची नऊवारी नेसली होती. तर अभिषेकने धोतर घातलं होतं. दोघांनीही एकमेकांना मॅचिंग लूक केला होता. दोघांच्याही लूकची जोरदार चर्चा होत असून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

अभिषेक आणि सोनालीच्या लग्नाचे फोटो इंटरनेटवर व्हायरल होत आहेत. दोघांचा लग्नसमारंभ मालवणमध्ये पार पडला. अभिषेक गांवकरची बायको सोनाली ही एक सोशल मीडिया स्टार आहे. ती सोशल मीडियावर बरीच सक्रिय असते.वेगवेगळ्या प्रकारचे मनोरंजक व्हिडीओ ती बनवत असते.

‘सारं काही तिच्यासाठी’ फेम अभिषेक गावकर अडकला लग्नबंधनात, प्रसिद्ध सोशल मीडिया इन्फ्लूएन्सरशी बांधली लग्नगाठ; पाहा Photos






