पाकिस्तानच्या हायकोर्टात वकिलांचा राडा! (Photo Credit- X)
मिळालेल्या वृत्तानुसार, लाहोर हायकोर्ट बार असोसिएशनच्या निवडणुकांचे वारे वाहत आहेत. या निवडणुकीच्या प्रचारादरम्यान आणि मतभेदांमुळे दोन गटांतील वकिलांमध्ये वाद विकोपाला गेला. सुरुवातीला शाब्दिक चकमक आणि घोषणाबाजी सुरू झाली, परंतु काही वेळातच त्याचे रूपांतर भीषण हाणामारीत झाले. वकिलांनी एकमेकांचे कपडे फाडले, शिवीगाळ केली आणि लाथाबुक्क्यांचा वापर केला.
🚨LAWLESS LAWYERS AT Lahore High Court Chaos during Lahore High Court Bar Association election Male lawyer harassed & assaulted a female lawyer INSIDE court War with #Afghanistan, protests outside US Consulate#Pakistan is on verge of collapse#الرياض_الان #امنون_مطمئنون pic.twitter.com/wdfHEJZrkk — Your Views Your News (@urviewsurnews) March 3, 2026
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये एक संतापजनक दृश्य पाहायला मिळत आहे. यामध्ये एक पुरुष वकील महिला वकिलासोबत मारहाण करताना दिसत आहे. या हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून त्या महिला वकिलाने रागाच्या भरात छताच्या पंख्याचा एक तुटलेला भाग त्या वकिलाच्या दिशेने भिरकावला. हा संपूर्ण प्रकार सुरू असताना तिथे उपस्थित असलेल्या एका व्यक्तीने हा व्हिडिओ आपल्या मोबाईलमध्ये कैद केला, जो आता जगभर चर्चेचा विषय ठरला आहे.
पाकिस्तान आधीच दहशतवादाला खतपाणी घालण्यासाठी जागतिक स्तरावर बदनाम आहे. आता उच्च न्यायालयासारख्या पवित्र ठिकाणी अशा प्रकारे कायद्याच्या चिंधड्या उडवल्या गेल्यामुळे पाकिस्तानची उरलीसुरली प्रतिष्ठाही धुळीला मिळाली आहे. सोशल मीडिया यूजर्स या घटनेचा तीव्र निषेध करत असून, “जर न्यायमंदिरातच वकील एकमेकांचे रक्त सांडत असतील, तर सामान्य नागरिकांनी न्यायासाठी कोणाकडे पाहायचे?” असा संतप्त सवाल विचारला जात आहे.
या घटनेमुळे पाकिस्तानच्या सुरक्षा यंत्रणेवर आणि न्यायालयातील शिस्तीवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. निवडणुकीच्या नावाखाली वकिलांनी केलेली ही गुंडगिरी आंतरराष्ट्रीय स्तरावर पाकिस्तानसाठी मोठी नामुष्की ठरली आहे. अद्याप या प्रकरणातील दोषी वकिलांवर कोणती कारवाई करण्यात आली आहे, याबद्दल अधिकृत माहिती समोर आलेली नाही.






