फोटो सौजन्य: Pinterest
अंकशास्त्रानुसार, विशेषतः 1, 3 आणि 9 या मुलांकाच्या मुलींबद्दल असे मानले जाते की, त्या साध्या राहणीमानाच्या असल्या तरी त्यांच्या विचारांची उंची खूप मोठी असते. त्या दिखावा करत नाहीत, पण त्यांच्या आत्मविश्वासपूर्ण बोलण्यामुळे आणि ठाम भूमिकेमुळे लोकांवर छाप पडते.
मुलांक 1 च्या मुली जन्मतःच नेतृत्वगुण घेऊन येतात. यांचा स्वाामी सुर्य असतो. त्यामुळे सूर्यासारखं तेज यांच्यात असतंं. या मुलींची निर्णयक्षमता प्रबळ असते आणि कोणत्याही परिस्थितीत पुढाकार घेण्याची तयारी असते. त्या स्वाभिमानी आणि स्वतंत्र विचारांच्या असतात. स्वतःचे ध्येय स्पष्ट असल्यामुळे त्या मेहनतीने ते साध्य करण्यासाठी प्रयत्न करतात. बोलताना त्यांचा आत्मविश्वास जाणवतो, त्यामुळे चर्चेत त्यांना सहज हरवणे कठीण असते.
मुलांक 3 च्या मुली बुद्धिमत्ता आणि सर्जनशीलतेसाठी ओळखल्या जातात. गुरु ग्रहाचा ज्ञानी स्वभाव यांच्यात पाहायला मिळतो. या मुलींना संवाद साधण्याची कला जन्मत: अवगत असते. शिक्षण, कला, लेखन किंवा व्यवस्थापन अशा क्षेत्रांमध्ये त्या चमकताना दिसतात. त्यांचा आशावादी स्वभाव आणि सकारात्मक दृष्टिकोन लोकांना प्रेरणा देतो. त्यांचं व्यक्तिमत्त्व आकर्षक आणि प्रभावी असतं.
मुलांक 9 च्या मुली मनाने संवेदनशील पण तितक्याच धाडसी असतात. मंगळाचा कणखरपणा यांना लहान वयातच मिळालेला असते. या मुली न्यायप्रिय आणि मदतीस तत्पर असतात. समाजासाठी काहीतरी करण्याची भावना त्यांच्यात प्रबळ असते. भावनिक समज आणि मानसिक ताकद यामुळे त्या नातेसंबंध जपण्यात यशस्वी ठरतात.एकूणच 1, 3 आणि 9 मुलांकाच्या मुली साधेपणातही उठून दिसतात. उच्च विचारसरणी, स्पष्ट मतं आणि प्रभावी संवादकौशल्य यामुळे त्या आयुष्यात स्वतःचं वेगळं स्थान निर्माण करतात.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)






