नवी दिल्ली : प्रसिद्ध कॉमेडियन राजू श्रीवास्तव (Raju Shrivastav) यांची मृत्युशी सुरु असलेली झुंज अखेर संपली. राजू श्रीवास्तव यांच निधन झालं आहे. वयाच्या 59 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांच्यावर दिल्लीतील एम्स रुग्णालयात उपचार सुरू होते.
[read_also content=”https://www.navarashtra.com/india/tamil-nadu-sadhu-arrested-for-threatening-bank-officials-328281.html बंदूक घेऊन बँक लुटण्यासाठी पोहोचला साधू, मुलीच्या शिक्षणासाठी कर्ज न मिळाल्याने होता नाराज”]
राजू श्रीवास्तव त्यांच्या प्रकृतीबद्दल जाणून घेण्याासाठी चाहत्यांचे लक्ष लागलेलं होतंं. त्यांच्या प्रकृतीत सुधारणा व्हावी यासाठी प्रार्थना करत होते. मात्र या दरम्यान त्यांच्या चाहत्यांसाठी दुखद बातमी समोर येतेय. राजू श्रीवास्तव यांनी जगाचा निरोप घेतला. १० ऑगस्ट २०२२ ला राजू श्रीवास्तव (Raju Srivastava) हॉटेलच्या जीममध्ये वर्कआऊट करत होते. ट्रेडमिलवर व्यायाम करत असताना त्यांच्या अचानक छातीत दुखू लागले आणि ते लगेचच खाली कोसळले. त्यानंतर श्रीवास्तव यांच्या जीम ट्रेनरने त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल केलं. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, त्यांची प्रकृती स्थिर होती. मात्र, एक महिन्यापुर्वी त्यांना उपचारांसाठी दिल्लीच्या एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं (Admitted To AIIMS Hospital, Delhi). सुरुवातीला त्यांच्या प्रकृतीत कोणतीही सुधारणा होत असल्याची माहिती त्यांच्या कुटुंबियांनकडून देण्यात येत होती तसच डॉक्टरांचे पथक त्यांच्यावर सातत्याने लक्ष ठेवून होते. मात्र, राजू श्रीवास्तव यांना ICU त जीवनरक्षक प्रणालीवर ठेवण्यात आले होते.
कौटुंबिक सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजू श्रीवास्तव यांच्या पत्नी शिखा यांना फोन करून त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली होती आणि सर्वतोपरी सहकार्य करणार असल्याचे आश्वासन दिले होते. याशिवाय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी राजू श्रीवास्तव यांच्या कुटुंबीयांशी बोलून त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली होती आणि मदतीचा हातही पुढे केला होता.