मुंबई : गेल्या अनेक दिवसापासून अभिनेत्री शार्लिन चोप्रा चर्चेत आहे. शार्लिन चोप्राने दिग्दर्शक साजिद खानने तिचा लैंगिक छळ केल्याचं म्हण्टलं होतं. आता शर्लिननं दिग्दर्शक साजिद खान (Sajid Khan) यांच्या विरोधात लैंगिक छळाची तक्रार दाखल केली आहे. शनिवारी रात्री जुहू पोलीस ठाण्यात (Juhu Police Station) शर्लिननं तक्रार दाखल केली. पोलिस लवकरात लवकर साजिद खानला जवाब नोंदवण्यासाठी बोलवणार असल्याचंही तिनं सांगितलं.
[read_also content=”कंगनाची राजकारणात एन्ट्री करणार? हिमाचलमधील ‘या’ जागेवर निवडणूक लढण्याचे दिले संकेत https://www.navarashtra.com/india/will-kangana-ranaut-will-enter-in-politics-nrps-340147.html”]
सध्या बिग बॉस 16 मधील स्पर्धक असलेल्या दिग्दर्शक साजित खान अडचणीत येण्याची चिन्ह दिसत आहे. अभिनेत्री शर्लिन चोप्रानं साजिदविरोधात जुहू पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. काल संध्याकाळी जुहू पोलिसांनी शर्लिनचा जबाब नोंदवला. यावेळी तिनं सांगितलं की, आज जुहू पोलिसांनी माझा जबाब नोंदवला आहे, तसचं पोलिसांनी आश्वासन दिलंय की, ते साजिद खानला लवकरात लवकर बिग बॉसच्या घरातून बोलवून त्याचा जबाब नोंदवणार आहेत.