जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री डॉ. फारूख अब्दुल्ला यांच्यावर गोळीबार (फोटो सौजन्य - सोशल मीडिया)
J&K Police say, “An incident of firing was reported at a function where JKNC chief Farooq Abdullah and Deputy CM Surinder Choudhary were present. One person has been arrested. More details awaited.” — ANI (@ANI) March 11, 2026
जम्मू आणि काश्मीरचे माजी मुख्यमंत्री जम्मूच्या ग्रेटर कैलाश भागात एका वकिलाच्या लग्नाला उपस्थित राहण्यासाठी गेले होते. कमल सिंग जामवाल असे आरोपीला सुरक्षा कर्मचाऱ्यांनी अटक करून ताब्यात घेतले आहे आणि पोलिसांनी तपास सुरू केला आहे. दरम्यान नक्की काय घडले याबाबत आता तपासणीला सुरूवात झाली आहे.
उपमुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला यांच्यासोबत उपस्थित
फारुख अब्दुल्ला सध्या सुरक्षेच्या ताफ्यात आहेत. जम्मू आणि काश्मीरचे उपमुख्यमंत्री सुरिंदर चौधरी देखील त्यांच्यासोबत होते. सुरिंदर चौधरी यांना शस्त्रांच्या तुकड्यांमुळे किरकोळ दुखापत झाली आणि त्यांना वैद्यकीय मदत देण्यात आली आहे असेही वृत्तात सांगण्यात आले आहे.
बँक्वेट हॉलमधून बाहेर पडताच झाला गोळीबार
फारुख अब्दुल्ला बुधवारी (११ मार्च) जम्मूमध्ये होते. ते त्यांचा मुलगा, वकील आणि पक्षाच्या एका कार्यकर्त्याच्या लग्नाला उपस्थित राहण्यासाठी आले होते. फारुख अब्दुल्ला सुमारे एक तास तिथेच थांबले. बँक्वेट हॉलमधून बाहेर पडताच त्यांच्यावर गोळीबार करण्यात आला. आरोपी झुडुपात लपून बसला असल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान हा गोळीबार का करण्यात आला आणि यामागे कोणाचा काय हेतू आहे याबाबत कोणतीही स्पष्टता नाही. पोलिसांनी याबाबत अजून कोणतेही अपडेट दिले नाही.
बातमी अपडेट होत आहे….






