अभिनेता हृतिक रोशन ( kissing scene) आणि अभिनेत्री दिपीका पादुकोनची (Dipika Padukon) मुख्य भूमिका असलेला फायटर चित्रपट चांगलाच गाजतोय. चित्रपट तिकीट खिडकीवर प्रेक्षकांना खेचून आणण्यात यशस्वी झाला असून चित्रपटानं आतापर्यंत 181 कोटींची कमाई केली आहे. चित्रपट रिलीज होऊ 13 दिवस उलटले आहेत अजुनही प्रेक्षकांमध्ये चित्रपटाविषयी क्रेझ आहे. पण चित्रपटाबद्दल काहीशी चिंताजनक बातमी (Fighter Controversy) समोर आली आहे. चित्रपटातील एका दृष्यावर हवाई दलाच्या एका अधिकाऱ्याने आक्षेप घेतला आहे. यासंदर्भात त्यांनी कायदेशीर चित्रपटाची स्टारकास्ट आणि दिग्दर्शकाला नोटीस बजावली आहे.
[read_also content=”भारतीय पर्यटक व्हिसाशिवाय इराणला जाऊ शकतील, फक्त ‘या’ 4 अटी पूर्ण कराव्या लागतील! https://www.navarashtra.com/world/iran-announces-visa-free-entry-for-indian-tourists-entering-by-air-nrps-505134.html”]
फायटर चित्रपटात हृतिक रोशन आणि अभिनेत्री दिपीका पादुकोन यांना हवाई दलाच्या लढाऊ वैमानिकांच्या भूमिकेत दाखवण्यात आलं आहे. चित्रपटात अनेक हवाई दृष्यांनी वाहवा मिळवली आहे. यासाठी दिग्दर्शकाचं चांगलच कौतुक होत आहे. असं असतानाही मात्र, चित्रपटातील एका दृष्यावर हवाई दलाच्या एका अधिकाऱ्याने आक्षेप घेतला आहे.
चित्रपटातील एका दृष्यात हृतिक रोशन आणि दीपिका पदुकोणने हवाई दलाच्या युनिफॉर्ममध्ये एकमेकांना किस करताना दिसत आहेत. हृतिक-दीपिकाच्या किसिंगच्या या दृष्यावर आक्षेप घेत आसाममध्ये पोस्टिंग असलेल्या भारतीय हवाई दलातील विंग कमांडरचे सौम्यदीप दास यांनी या दृष्यावर आक्षेप घेत स्टारकास्ट आणि दिग्दर्शकाला नोटीस बजावली आहे.