अभिनत्री ऐश्वर्या राय () सध्या खूप चर्चेत आहे. कान्स फिल्म फेस्टीवल मध्ये तीनं दोनदा हजेरी लावली. तिच्या दोन्ही लूकमुळे जगभरात तिचं खुप चर्चा होत आहे. काहींनी तिच्या लूकला पसंती दर्शवली तर काहींनी तिला खुप ट्रोल केलं. महत्त्वाचं म्हणजे यावेळी ऐश्वार्याच्या हातावर प्लास्टर बांधला होतं तरीही ट्रोलर्सची पर्वा न करता ऐश्वर्यानं आत्मविश्वासानं कान्समध्ये आपल्या लूकमुळे सर्वांना आपली दखल घेण्यास भाग पाडलं. आता नुकतीच ती भारतात परतली असून आता तिच्यावर लवकरच शस्त्रक्रिया पार पडणार आहे.
[read_also content=”शाहिद कपूर, जान्हवी कपूर, फरहान अख्तरसह अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनी मुंबईत केलं मतदान! https://www.navarashtra.com/movies/shahid-kapoor-janhvi-kapoor-rajkumar-rao-cast-their-vote-in-loksabha-election-mumbai-nrps-535473.html”]
रिपोर्ट नुसार, ऐश्वर्याच्या एक आठवड्याआधी ऐश्वर्याच्या हाताला दुखापत झाली. हाताला फ्रॅक्चर असूनही तिने कान्स फिल्म फेस्टीव्हलला हजेरी लावली. ऐश्वर्या गेल्या 20 वर्षापासन ‘कान्स फिल्म फेस्टिव्हल’ला उपस्थित राहतेय. त्यामुळे दरवर्षीप्रमाणे यंदाही ती कान्समध्ये सहभागी झाली. हात मोडलेला असतानाहीही तिने आपल्या व्यावसायिक कमिटमेंट्स पूर्ण केल्या.
ऐश्वर्या राय आता सध्या कान्स फिल्म फेस्टीवलला हजेरी लावून फान्समधून भारतात परत आली आहे. तिथे ती तिच्या मुलीसोबत गेली होती. आता परत्यानंतर ऐश्वर्या रायवर शस्त्रक्रिया होणार आहे. तिच्या हाताला नेमकी दुखापत कशी झाली हे अद्याप समोर आलेलं नाही. मात्र, तिची शस्त्रक्रिया या आठवड्याच्या शेवटी पार पडणार आहे.
गेल्या 22 वर्षांपासून, ऐश्वर्या राय बच्चन सतत कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये हजेरी लावत आहेआणि प्रत्येक वेळी ती तिच्या वेगवेगळ्या लूकने चाहत्यांना प्रभावित करते. पहिल्या दिवशी तिने काळ्या आणि सोनेरी रंगाचा लॅांग गाऊन घातला होता तर दुसऱ्या दिवशी आकाशी सिल्वर कलकचा ड्रेस घातल होता. फ्रान्सच्या फ्रेंच रिव्हिएरामध्ये 14 मे रोजी 77 वा वार्षिक कान चित्रपट महोत्सव सुरू झाला असून हा कार्यक्रम 25 मे पर्यंत चालणार आहे.
ऐश्वर्याच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचं झालं तर, ती नुकतचं ‘पोनीयिन सेल्वन 2’ या चित्रपटात दिसली होती, ज्यामध्ये तिने चियान विक्रम आणि जयम रवी सारख्या स्टार्ससोबत काम केले होते. हा एक पीरियड ड्रामा चित्रपट होता, ज्यामध्ये ऐश्वर्याच्या दमदार अभिनयाचं खूप कौतुक झालं. आता चाहते त्याच्या नव्या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत.