फोटो सौजन्य - Social Media
अभिनेता अक्षय कुमार एका चित्रपटामध्ये वादाच्या भोवऱ्यात सापडले होते. महत्वाचे म्हणजे हा वाद घरगुती होता. हा वाद इतका शिघेला पोहचला होता कि अक्षय कुमारची पत्नी अभिनेत्री ट्वीनकलने घर सोडले होते. ही त्या कालची घटना आहे, ज्यावेळी बरसात या चित्रपटाचे प्री प्रोडक्शन होत होते. दिग्दर्शक सुनील दर्शनने याबद्दल एका मुलाखतीत सांगितले आहे. बरसात हा सिनेमा २००५ साली प्रदर्शित करण्यात आला होता. या सिनेमात अभिनेता बॉबी देओल लीड ऍक्टर होता. तर प्रियांका चोप्रा आणि बिपाशा बासू देखील या सिनेमात दिसून आले होते. बरसात या चित्रपटासाठी आधी अक्षय कुमारला साइन केले गेले होते. पण नंतर एका वादामुळे अक्षयला हा चित्रपट सोडावा लागला होता.
बरसात या चित्रपटासाठी अक्षयने प्रियांका चोप्रासोबत एक गाणेही शूट केले होते. त्याकाळात, दोघांच्या अफेअरबद्दल अफवेने वेग धरला होता. हा वेग इतका होता कि ती अफवा स्वतः अक्षय कुमारच्या घरापर्यंत आली. या गोष्टीच्या रागाने एकवेळ अशी आली कि अक्षय कुमारच्या पत्नीने घर सोडले. या अफवेचा परिणाम अक्षयच्या वैवाहिक जीवनावर होऊ लागला. परिणामी, त्याला हा चित्रपट सोडवा लागला होता. महत्वाची बाब अशी आहे कि, या नंतर अक्षय कुमार यांनी कधीच प्रियांका सोबत काम केले नाही.
दिग्दर्शन सुनील दर्शन ‘फ्राइडे टॉकीज’ ला मुलाखत देताना म्हणाले कि,” अक्षय कुमार ‘बरसात’ या सिनेमाचा हिरो होता. शूटिंगला सुरुवात होताच त्याच्या घरामध्ये काही विचित्र घटना घडायला लागल्या. चित्रपटाचे शूटिंग अगदी शेड्युलमध्ये होणार होते. शेड्युलच्या पाच दिवसांआधी अक्षयने मला फोन करून भेटायला बोलवले. जेव्हा मी अक्षयला भेटायला जात होतो, तेव्हा बॉबीच्या मॅनेजरने मला फोन केला आणि हा चित्रपट बॉबीसोबत करावा असे सांगितले. तेव्हा मी त्याला जरा वेळ धीर धरायला सांगितले होते.” सुनील दर्शन म्हणतो कि अक्षय कुमार याची पत्नी ट्वीनकल खन्ना स्वतः एक अभिनेत्री आहे. त्यामुळे तिला इंडस्ट्रीमध्ये घडणाऱ्या गोष्टींविषयी ठाऊक आहे.
हे देखील वाचा : ‘मी, पप्पा आणि ओंकार पुन्हा भेटू नव्याने….’; अपूर्वा नेमळेकरची Emotional पोस्ट
पूढे अक्षय कुमारने सिनेमा करण्यास नकार दिल्याने बॉबी देओलला सिनेमामध्ये अक्षयच्या जागी रिप्लेस केले गेले. तसेच त्याच्यासोबत आणखीन ३ सिनेमांचे डील करण्यात आले.