सलमान आणि शाहरूख जे नाही करू शकला ते अल्लू अर्जूनने करून दाखवलं, 'पुष्पा २ द रूल'ची देशभरात चर्चा
अल्लू अर्जुनचा बहुप्रतीक्षित ‘पुष्पा २’चित्रपट ५ डिसेंबर २०२४ ला प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाने केलेल्या जबरदस्त मार्केटिंग आणि प्रमोशनमुळे हा चित्रपट कमाईचे नवे उच्चांक गाठताना पाहायला मिळत आहे. ॲडव्हान्स बुकिंगला ३० नोव्हेंबरपासून सुरूवात झाली आहे. जेव्हापासून ॲडव्हान्स बुकिंगला सुरूवात झाली तेव्हापासून चाहत्यांनी तिकीटबारीवर तिकीट खरेदी करण्यासाठी एकच गर्दी केलेली दिसत आहे. अवघ्या काही तासांतच लाखो तिकिटं विकली गेली आहेत. पेटीएम वरील तिकीट बुकिंगमध्ये चित्रपटाने आपली छाप पाडली आहे, यावरून चित्रपटाबद्दल किती चर्चा सुरू आहे, याचा अंदाज लावता येईल.
‘आई कुठे काय करते’ फेम अभिनेत्याची भावुक पोस्ट, वाचा सविस्तर…
चित्रपट प्रेक्षकांपर्यंत पोहोचावा यासाठी अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदाना पटना, चेन्नई, कोची आणि मुंबईत या शहरात फिरले. चित्रपटाच्या डिजिटल आणि टेलिव्हिजन राईट्सच्या विक्रीने कमाईचे नवे विक्रम गाठले आहेत. आता हा चित्रपट ॲडव्हान्स बुकिंगमध्ये नवे उच्चांक गाठणार असा अंदाज लावला जात आहे. दिग्दर्शकांनी त्यांच्या अधिकृत इन्स्टाग्राम हँडलवर चित्रपटाच्या नवीन रेकॉर्डबद्दल माहिती दिली आहे. Pushpa: The Rule चित्रपटाने Paytm वर 2.6 मिलियन म्हणजेच 26 लाख व्यूज मिळवणारा पहिला भारतीय चित्रपट ठरला आहे. याआधी कोणत्याही चित्रपटाला एवढी पसंती मिळाली नव्हती. २६ लाख इतक्या लोकांनी या ॲपवर चित्रपट पाहण्याची इच्छा व्यक्त केली आहे. आता ॲडव्हान्स बुकिंग सुरू झाल्यानंतर ही बाबही खरी ठरताना दिसत आहे.
Pushpa: The Rule च्या तिकिटांचे बुकिंग वेगाने सुरू आहे. सॅकनिल्कच्या अहवालानुसार, ॲडव्हान्स बुकिंगमध्ये रविवारी दुपारपर्यंत चित्रपटाची ३ लाख ३१ हजार ५०३ तिकिटे बुक झाली आहेत. इतक्या तिकिटांची किंमत ९.९ कोटी रुपये आहे. ही आकडेवारी फक्त पहिल्या दिवसाची आहे. याशिवाय, ब्लॉक सीट्ससह हा आकडा आधीच १५. ३४ कोटी रुपयांच्या पुढे गेला आहे. तेलंगणामध्ये १. ६७ कोटी रुपयांपेक्षा जास्त, कर्नाटकात १. ४५ कोटी रुपये, महाराष्ट्रात १. ६ कोटी रुपये, गुजरातमध्ये ७०. ६२ लाख रुपये, दिल्लीमध्ये ८४.०४ लाख रुपये आणि ओडिशामध्ये ७७.५२ लाख रुपयांची तिकिटे विकली गेली आहेत.
शाहरूख खानच्या एका सल्ल्याने बादशाहचं बदललं आयुष्य, स्वत: केला खुलासा
अॅक्शन-ड्रामा असणाऱ्या ‘पुष्पा द रुल’चित्रपटात अल्लू अर्जुन, रश्मिका मंदाना आणि फहाद फासिल यांच्या प्रमुख भूमिका आहेत. चित्रपटाचे दिग्दर्शन सुकुमार करत असून आणि पहिल्याही भागाचं दिग्दर्शन त्यांनीच केलं आहे. ‘पुष्पा द रुल’चित्रपट येत्या ५ डिसेंबरला थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट तेलुगू, हिंदी, तमिळ, कन्नड, बंगाली आणि मल्याळम भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. ॲडव्हान्स बुकिंग पाहता हा चित्रपट २०२४ मधील सुपरहिट आणि ब्लॉकबस्टर चित्रपट ठरण्याची शक्यता वर्तवली जात आहे. चित्रपटाने आतापर्यंत ओटीटी राईट्स, प्री बुकिंग आणि टेलिव्हिजन राईट्समधून चित्रपटाचं प्रदर्शन होण्याआधी जबरदस्त कमाई केलेली आहे.