शाहरूख खानच्या एका सल्ल्याने बादशाहचं बदललं आयुष्य, स्वत: केला खुलासा
रॅपर आणि गायक बादशाहच्या गाण्यांचा फक्त देशातच नाही तर, परदेशातही फार मोठा चाहतावर्ग आहे. दरम्यान, बादशाहची गाणी आपण अनेक फंक्शन्समध्ये ऐकतो. त्याच्या गाण्यावर थिरकणाऱ्या चाहत्यांचीही संख्या फार मोठ्या प्रमाणावर आहे. कायमच आपल्या गाण्यांमुळे चर्चेत राहणाऱ्या बादशाहने करियरच्या दिवसांमधला वाईट काळातला अनुभव सांगितला आहे. ज्या गाण्यांच्या जोरावर आज बादशाह प्रसिद्ध आहे, त्याच गाण्यांमधून बादशाहला करियरच्या सुरूवातीच्या काळात अपेक्षित यश मिळत नव्हते. त्याच दरम्यान रॅपर बादशाह आणि शाहरूख खानची एक दिवशी भेट झाली. त्या भेटीत शाहरूखने बादशाहला दिलेला सल्ला फार मोलाचा ठरला. हा मोलाचा सल्ला त्याला फार प्रेरणादायी ठरला आहे.
माधुरी दीक्षितलाही करावा लागला होता बॉडी शेमिंगचा सामना, स्वतःच सांगितला किस्सा
बादशाह कठीण काळातून सावरत होता, त्यातून सावरत असताना शाहरूख खानच्या एका सल्ल्याने बादशाहला खूप प्रेरणा मिळाली, त्या एका निर्णयाने बादशाहच्या करिअरची गाडी रुळावर आली होती. बादशाह एका मुलाखतीत म्हणालेला, “गेल्या काही दिवसांपूर्वी मी विमानात शाहरूख खानला भेटलो होतो. त्या भेटीचा मला खूप फायदा झाला. मी माझ्या क्रिएटिव्हीटीच्या दृष्टिकोनातून कठीण टप्प्यातून जात होतो. शाहरूख सरांची मॅनेजर पूजा ददलानी सर्वात पहिले आली होती. तू तुझी मॉडेलिंग पूर्ण केली आहेस का? असा तिने मला प्रश्न विचारला आणि नंतर ती निघून गेली. त्यानंतर तिने मला बोलवलं. मला वाटले की ती एकटीच आहे की काय. पण मी आतमध्ये गेल्यानंतर पाहिले की तिथे शाहरुख खानही बसलेला होता.”
‘आर्यन्स सन्मान’ चित्रपट-नाटक सोहळ्याची नामांकने घोषित…
शाहरुख खानसोबत झालेला संवाद सांगताना बादशाह म्हणाला, “मी त्यावेळी एक गाणे बनवले होते, जे चांगले नव्हते. नुकतेच जेव्हा मी शाहरुख खान सरांना फ्लाईटमध्ये भेटलो तेव्हा त्यांनी मला विचारलं की, संगीत कसं चालू आहे. तर मी म्हणालो, ‘मी एक गाणं केलं, जे चांगलं नव्हतं झालं.’ तेव्हा त्यांनी मला ते बनवू नकोस असे सांगितले. मी त्यानंतर इंडस्ट्रीतून चार वर्ष ब्रेक घेतला होता, मी त्या चार वर्षांत फक्त पास्ता बनवायला शिकलो. चांगला पास्ता कसा तयार करावा हे शिकायला मला चार वर्ष लागली. यानंतर माझं जेव्हा मन झालं तेव्हाच मी मनापासून चांगले सिनेमे तयार केले. त्यामुळे जेव्हा तुला तुझ्या मनापासून वाटेल तेव्हा गाणं तयार कर, पण तेव्हा संपूर्ण मन लावून ते गाणं चांगलं बनव,” असा सल्ला शाहरुख खानने बादशाहला दिला.
बादशाहने पुढे सांगितले की, “शाहरुख सरांच्या त्या शब्दांनी मला खूप प्रेरणा दिली. जेव्हा शाहरुख खानसारख्या व्यक्तिमत्त्वाकडून आपल्याला मदत मिळते तेव्हा खूप चांगलं वाटत. आयुष्यात कोणतीही गोष्ट करण्यासाठी हेतू खूप महत्त्वाचा असतो.”धर्मा प्रॉडक्शनच्या ‘सनी संस्कार की तुलसी कुमारी’ या चित्रपटात बादशाह अभिनय करताना दिसणार असल्याची माहिती आहे. शिवाय, वरुण धवनच्या ‘बेबी जॉन’ चित्रपटातील ‘गेट रेडी’हे गाणं रॅपर बादशाहने तयार केले आहे. सध्या तो ‘इंडियन आयडॉल १४’ मध्ये जजच्या भूमिकेत दिसत आहे.