सौजन्य - सोशल मिडीया
मुंबई : अल्लु अर्जुनचा पुष्पा 2 द रुल चित्रपटासाठी आता चाहत्यांना वाट पाहावी लागणार आहे. सोशल मिडीयावर चित्रपटाचा पोस्टर शेअर करत 6 डिसेंबर ला प्रर्दशित होणार असल्याचे अल्लु अर्जुनने सांगितले आहे. गेल्या काही दिवसांपासुन याविषयीच्या चर्चा सुरु होत्या, पण कोणत्याही प्रकारची माहिती समोर आली नव्हती. अखेर काल 17 जुन ला अधिकृतरित्या तारीख जाहीर करण्यात आली.
प्रेक्षकांना आता 6 महिने वाट बघावी लागणार आहे. प्रेक्षकांमध्ये मोठ्या प्रमाणात उत्सुकता निर्माण झाली आहे. चित्रपटातील दोन गाण्यांनी प्रेक्षकांना वेडं लावलं आहे. प्रत्येकांच्या ओठांवर पुष्पा-पुष्पा आणि अंगारों ही दोन गाणी आहेत. अंगारों या गाण्यावर मोठ्या प्रमाणात रील्स प्रेक्षक बनवत आहेत.
परंतु अचानक तारीख बदल्याचे कारण असल्याचे अद्याप निर्मात्यांनी स्पष्ट केलेले नाही. पुष्पा 2 द रुल च्या सोशल मीडिया पेजवर प्रदर्शनाच्या नव्या तारखेची घोषणा करण्यात आली आहे. चित्रपटचा हिरो अल्लु अर्जुनचा नवा लूकचा पोस्टर शेअर करत लिहिलं आहे, “तुम्हाला सर्वोत्कृष्ट देण्याचा आमचा मानस आहे. आतुरता वाढली आहे काही चांगला अनुभव तुम्हाला चित्रपटगृहात मिळेल. आता जगभरात ‘पुष्पा २ : द रुल’चं ग्रँड प्रदर्शन 6 डिसेंबर 2024 होईल. त्याचे शासन अदभुत असेल, त्याचे शासन अभूतपूर्व असेल.”
We intend to give you the best 🔥
The wait increases for a memorable experience on the big screens.#Pushpa2TheRule Grand release worldwide on 6th DECEMBER 2024 💥💥
His rule will be phenomenal. His rule will be unprecedented ❤️🔥
Icon Star @alluarjun @iamRashmika @aryasukku… pic.twitter.com/3JYxXd2YgF
— Pushpa (@PushpaMovie) June 17, 2024