Google Pixel Watch 4: क्या बात, क्या बात! Gemini अॅक्सेस आणि हेल्थ फीचर्सने सुसज्ज... Google चं नवं स्मार्टवॉच गाजवणार मार्केट
Made by Google ईव्हेंटमध्ये Google Pixel Watch 4 हे स्मार्टवॉच लाँच करण्यात आले आहे. हे स्मार्टवॉच दोन आकारात लाँच करण्यात आले आहे आणि या स्मार्टवॉचचे डिझाईन Pixel Watch 3 सारखे आहे. Google नुसार, Pixel Watch 4 चे यूजर Gemini ला क्विक अॅक्सेस करू शकतात. युजर्स केवळ मनगट वर करून व्हॉइस असिस्टंट सक्रिय करू शकता. यामध्ये 40 हून अधिक एक्सरसाइज मोड्स, लॉस ऑफ पल्स डिटेक्शन आणि दूसरे हेल्थ फीचर्स देखील देण्यात आले आहेत. हे स्मार्टवॉच एकदा चार्ज केल्यानंतर 45 तासांची बॅटरी लाईफ ऑफर करतात.
भारतात Google Pixel Watch 4 ची किंमत 41mm (Wi-Fi) व्हेरिअंटसाठी 39,900 रुपयांपासून सुरु होते. हे स्मार्टवॉच 45mm साईजमध्ये देखील उपलब्ध आहे, ज्याची किंमत 43,900 रुपये आहे. अमेरिका आणि दुसऱ्या मार्केट्समध्ये कंपनी Pixel Watch 4 चा एलटीई व्हेरिअंट देखील ऑफर करत आहे. ज्याची किंमत 41mm व्हेरिअंटसाठी 449 डॉलर म्हणजेच सुमारे 39,000 रुपये आणि 45mm व्हेरिअंटसाठी 499 डॉलर म्हणजेच सुमारे 43,400 रुपये आहे. 41mm व्हेरिअंट आइरिस, लेमनग्रास, पोर्सिलेन आणि ओब्सीडियन कलर ऑप्शन्समध्ये लाँच करण्यात आले आहे. 45mm Pixel Watch 4 स्मार्टवॉच मूनस्टोन, पोर्सिलेन आणि ओब्सीडियन शेड्समध्ये खरेदीसाठी उपलब्ध आहे. (फोटो सौजन्य – X)
Google Pixel Watch 4 मध्ये मागील मॉडेलसारखाच कर्व्ड डिस्प्ले देण्यात आला आहे. कंपनीने सांगितलं आहे की, या स्मार्टवॉचमध्ये बेजल्स आणि पीक ब्राइटनेसमध्ये सुधारणा करण्यात आली आहे. यामध्ये Actua 360 ऑलवेज-ऑन डिस्प्ले आहे, जो 3,000 पर्यंत पीक ब्राइटनेसला सपोर्ट करतो आणि Pixel Watch 3 च्या तुलनेत 16 टक्के पातळ बेजल्स ऑफर करतात. हार्डवेयरमध्ये कोणताही बदल करण्यात आला नाही. यामध्ये Snapdragon W5 Gen 1 प्रोसेसर आहे, ज्याने पिक्सेल वॉचच्या मागील दोन जनरेशनांही शक्ती दिली. पण याचा अर्थ असा नाही की त्यात कोणतेही नवीन फीचर्स नाहीत.
Google नुसार, Pixel Watch 4 स्मार्ट रिप्लायला सपोर्ट करते आणि Gemini व्हॉईस असिस्टेंटसह क्विक अॅक्सेस देते. हे फीचर फक्त मनगट वर करून सक्रिय केले जाऊ शकते आणि पर्सनलाइज्ड सजेशन, मदत आणि इतर वैशिष्ट्ये प्रदान करू शकते. हे स्मार्टवॉच Material 3 Expressive UI वर चालते.
Google च्या या लेटेस्ट स्मार्टवॉचमध्ये 40 हून अधिक एक्सरसाइज मोड्स सपोर्ट देण्यात आले आहे. हे रियल टाइममध्ये स्टॅटिस्टिक्स देते आणि यूजर रनिंगसाठी कस्टम प्लॅन बनवू शकतात. यासेबतच रियल टाइम गाइडेंस देखील ऑफर केला जातो. लॉस ऑफ पल्स डिटेक्शन फीचर पल्सचे निरीक्षण करतो. कोणत्याही असामान्य परिस्थितीत ते आपत्कालीन संपर्क आणि सेवांना सतर्क करू शकते. यात फॉल डिटेक्शन देखील आहे, जे त्याच प्रकारे कार्य करते. याशिवाय, Google Pixel Watch 4 स्मार्टवॉच ECG, SpO2, HRV आणि ब्रीदिंग रेट डिटेक्शनने सुसज्ज आहे. कनेक्टिविटी ऑप्शन्समध्ये डुअल-फ्रीक्वेंसी GPS, Wi-Fi आणि LTE सपोर्ट समाविष्ट आहेत. Pixel Watch 4 चा 41mm व्हेरिएंट एका चार्जवर 30 तासांपर्यंत वापरण्याची सुविधा देऊ शकतो.