मुंबई : महानायक अमिताभ बच्चन (Amitabh Bacchan) यांचा बहुप्रतिक्षित चित्रपट ‘उंचाई’ (Uunchai) आज प्रदर्शित झाला. बऱ्याच मोठ्या ब्रेकनंतर दिग्दर्शक सुरज बडजात्या यांच्या चित्रपट पडद्यावर येत असल्याने प्रेक्षकांसहीत सेलिब्रिटींनाही चित्रपटाकडून फार अपेक्षा आहेत. या पार्श्वभुमीवर चित्रपटाचे अभिनेते बिग बी अमिताभ बच्चन यांनी आज मुंबईतील सिद्धिविनायकाचं दर्शन घेतलं. यावेळी सिद्धिविनायक मंदिर देवस्थानचे विश्वस्तांनी अमिताभ बच्चन यांना बाप्पाची मूर्ती देऊन त्यांचा सत्कारही केला.
[read_also content=”भारत जोडो यात्रा आजपासून चार दिवसांसाठी हिंगोली जिल्ह्यात https://www.navarashtra.com/maharashtra/bharat-jodo-yatra-for-four-days-from-today-in-hingoli-district-nrps-343556.html”][read_also content=”भारत जोडो यात्रा आजपासून चार दिवसांसाठी हिंगोली जिल्ह्यात https://www.navarashtra.com/maharashtra/bharat-jodo-yatra-for-four-days-from-today-in-hingoli-district-nrps-343556.html”]
अलिकडेच प्रदर्शित झालेल्या कांतार चित्रपटाचा दिग्दर्शक अभिनेता रिषभ शेट्टीनेही सिद्धिविनायक मंदिरात हजेरी लावली होती. त्यानंतर आज बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चनही सिद्धिविनायक चरणी आलेले पाहायला मिळाले. ‘उंचाई’ हा बिग बी यांचा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे. त्यासाठी आशीर्वाद घ्यायला बिग बी अभिषेकबरोबर सिद्धिविनायकाच्या दर्शनासाठी आले होते. सकाळी सकाळी बिग बी आणि ज्युनिअर बच्चन यांनी बाप्पाचे दर्शन घेतले आणि मनोभावे प्रार्थनादेखील केली. बच्चन हे बाप्पापुढे नतमस्तक झाले आणि त्यांनी हात जोडून प्रार्थनादेखील केली.
[read_also content=”पुणेकरांनो आता घरात मांजर पाळायचं असेल तर आधी महापालिकेची परवानगी घ्या! https://www.navarashtra.com/maharashtra/for-keeping-cat-at-home-permission-from-the-municipal-corporation-is-mandatory-nrps-343522.html”]
सध्या अमिताभ बच्चन त्यांचा क्विझ शो ‘कौन बनेगा करोडपती 14′ होस्ट करत आहेत. या शोमध्ये ‘उंचाई’ चित्रपटाची स्टारकास्ट अनुपम खेर, बोमन इराणी आणि नीना गुप्ता चित्रपटाच्या प्रमोशनसाठी आले होते. यादरम्यान अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या ‘उछाई’ चित्रपटाचे प्रमोशनही केले.