अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांचा ‘ब्रम्हास्त्र’ (Brahmastra) चित्रपट लवकरच रिलीज होणार आहे. या चित्रपटामधल्या त्यांच्या भूमिकेविषयी चाहत्यांमध्ये उत्सुकता होती. अखेरीस ‘ब्रम्हास्त्र’मधील बिग बी अर्थात अमिताभ बच्चन यांचा लुक (Amitabh Bachchan Brahmastra Look) समोर आला आहे.
धर्मा प्रॉडक्शनने त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन एक व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये अमिताभ यांचा रुपेरी पडद्यावर कधी न पाहिलेला लुक दिसत आहे. या व्हिडिओमध्ये अमिताभ यांच्या चेहऱ्यावर जखम दिसत आहे. तसेच हातात तलवार आहे. तसेच त्यांची नजर समोरच्याला थक्क करणारी आहे. त्यांच्या या लुकला काही मिनिटांमध्येच नेटकऱ्यांची भरभरुन पसंती मिळाली आहे.
“गुरू है गंगा ज्ञान की काटे भाव का पाश, गुरू उठा ले अस्त्र जब करे पाप का नाश”, असं धर्मा प्रॉडक्शनने हा व्हिडिओ शेअर करताना म्हटलं आहे. या चित्रपटामध्ये अमिताभ गुरु रुपात दिसणार असल्याचं यामधून स्पष्ट होत आहे. अमिताभ यांचा लुक पाहून आम्ही चित्रपटाच्या प्रतिक्षेत आहोत असं चाहत्यांनी कमेंट करत म्हटलं आहे.
[read_also content=”मनी लाँड्रिंग प्रकरण – अनिल देशमुखांना दिलासा देण्यास कोर्टाचा नकार, ‘हे’ आहे कारण https://www.navarashtra.com/maharashtra/no-relief-to-anil-deshmukh-in-money-laundering-case-nrsr-290557/”]
काही दिवसांपूर्वीच चित्रपटाचा टीझरही प्रदर्शित करण्यात आला होता. या चित्रपटामध्ये अमिताभ यांच्याबरोबरच मौनी रॉय, आलिया भट्ट, रणबीर कपूर, मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. अयान मुखर्जी दिग्दर्शित हा चित्रपट ९ सप्टेंबरला हिंदी, तमिळ, तेलुगू, मल्याळम, कन्नड भाषेमध्ये सर्वत्र प्रदर्शित होईल.