अमिताभ यांचे भावासोबत कसे आहे नाते ? बिग बींनी पहिल्यांदाच सांगितला किस्सा
Amitabh Bachchan On Bond With Brother Ajibath : बॉलिवूडचे महानायक बिग बी अमिताभ बच्चन सध्या ‘कौन बनेगा करोडपती’च्या सोळाव्या सीझनमुळे चर्चेत आहे. या शोमध्ये बिग बी त्यांचे वैयक्तिक आयुष्य स्पर्धकांसोबत शेअर करताना अनेकदा दिसतात. शोमध्ये येणाऱ्या सर्वच स्पर्धकांसोबत बिग बी दिलखुलास गप्पा मारताना तर दिसतात, शिवाय त्यांच्या आयुष्यातील अनेक किस्सेही जाणून घेण्याचा ते प्रयत्न करतात. यावेळी बिगबींच्या हॉट सीटवर गेल्या एपिसोडमध्ये एका स्पर्धक आला होता. त्याची कहाणी ऐकून बिग बी यांनी त्यांचा भाऊ अजिताभ बच्चनबद्दलही सांगितले.
अलीकडेच ‘कौन बनेगा करोडपती’च्या सोळाव्या सीझनमध्ये एका स्पर्धकाने अमिताभ बच्चन यांना त्यांच्या लहान भा प्रश्न विचारला होता. तो स्पर्धक म्हणाला, “तुम्हालाही एक लहान भाऊ आहे. मग त्याच्या आणि तुमचं नातं कसं आहे ?” यावर बिग बींनी उत्तर दिले, ‘हे भाऊ आणि बहिणीच नातं तितकच चांगलं आणि पवित्र असते. आम्ही एकमेकांना अनेकदा एकमेकांचे गुपित सांगायचो. ज्या गोष्टी आई-वडिलांसोबत आम्ही बोलू शकत नव्हतो, त्या गोष्टी आम्ही भावांना सांगायचो. आम्ही खूपदा भांडायचो आणि एकमेकांची गुपितं आई-बाबांना सांगायची धमकी देऊन ब्लॅकमेल करायचो.” असं अमिताभ यांनी सांगितलं. त्यांनी भावाबरोबरच्या जुन्या आठवणी सांगितल्यावर प्रेक्षक हसू लागले.
हे देखील वाचा – माणूस आणि भुताच्या नात्याची रंगतदार गोष्ट “एक डाव भुताचा” चित्रपटाचे टीजर झाले लाँच!
‘कौन बनेगा करोडपती’च्या पंधराव्या सीझनच्या फॅमिली स्पेशल वीकमध्ये, बिग बींनी त्यांचा भाऊ अजिताभ बच्चन यांच्याबद्दल एक खास किस्सा शेअर केला होता. अजिताभ यांनी बिग बींना फिल्म इंडस्ट्रीमध्ये काम करण्याचा सल्ला दिला होता. अमिताभ यांनी सांगितले की, “मी आणि माझा भाऊ कोलकात्यात नोकरी करत होतो. त्याने माझा फोटो काढला आणि एका स्पर्धेत पाठवला. पण त्या स्पर्धेसाठी माझी निवड झाली नाही. मात्र अजिताभने माझ्या मनात या क्षेत्रात येण्याचा विचार रुजवला. त्यानंतर मी कोलकात्यातील नोकरी सोडली होती.”