(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
बॉलिवूड अभिनेता अजय देवगण याचा तान्हाजी हा चित्रपट 2020 साली प्रदर्शित झाला होता. मात्र आजही हा चित्रपट प्रेक्षकांच्या लक्षात आहे. 2020 साली प्रदर्शित झालेला हा ऐतिहासिक चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट ठरला होता. 2026 मध्ये अनेक बॉलीवूड सिनेमांचे सीक्वेल येणार आहेत. फिर हेरा फेरी, नायक, ३ इडियट्स सारख्या अनेक गाजलेल्या चित्रपटांचा सीक्वेल प्रदर्शित होणार आहे. प्रेक्षकांना आता या सर्व चित्रपटांची उत्सुकता लागून राहिली आहे. अशातच आता यात आणखी एका सिनेमाची भर पडणार आहे तो सिनेमा म्हणजे अजय देवणगचा तान्हाजी चित्रपट.
अजय देवगणच्य तान्हाजी या चित्रपटाला नुकतीच सहा वर्ष पूर्ण झाली आहेत. त्या निमित्ताने अजय देवगणने एक खास पोस्ट शेअर केली होती. या पोस्टमधून अभिनेत्याने चित्रपटाच्या सीक्वेलची हिंट दिली आहे. या पोस्टमध्ये चित्रपटातील वेगवेगळ्या दृश्यांची पेंटिंग स्वरूपातील पोस्टर्स शेअर करण्यात आली आहोत. त्यामध्ये अजय देवगणसह काजोल, सैफ अली खान आणि शदर केळकर यांचीही पोस्टर्स दिसत आहेत. हि पोस्ट शेअर करत त्याने लिहिलं, ”गड आला पण सिंह गेला…. पण कथा अजून संपलेली नाही”, असं त्याने कॅप्शन दिलं आहे.या पोस्टमुळे सध्या सोशल मीडियावर तान्हाजी चित्रपटाच्या सीक्वलबाबत चर्चा सुरू झाली आहे.
‘तान्हाजी: द अनसंग वॉरियर’ बद्दल बोलायचे झाले तर, हा चित्रपट ओम राऊत यांनी दिग्दर्शित केला होता आणि १० जानेवारी २०२० रोजी प्रदर्शित झाला होता. हा चित्रपट अजय देवगण, भूषण कुमार आणि कृष्ण कुमार यांनी टी-सीरीज आणि अजय देवगणच्या एफफिल्म्स अंतर्गत तयार केला होता आणि बॉक्स ऑफिसवर त्याला प्रचंड यश मिळाले.
सैफ अली खानने तान्हाजीमध्ये खलनायकाची भूमिका केली होती, तर काजोलने तान्हाजीची पत्नी सावित्रीबाईची भूमिका केली होती. “तान्हाजी: द अनसंग वॉरियर” ला सर्वोत्कृष्ट लोकप्रिय चित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला.
अजय त्याच्या आगामी ‘धमाल ४’ चित्रपटासाठी पूर्णपणे सज्ज आहे, जो २०२६ मध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात रितेश देशमुख, अर्शद वारसी, संजय मिश्रा, ईशा गुप्ता, संजीदा शेख, अंजली आनंद, उपेंद्र लिमये, विजय पाटकर आणि रवी किशन यांच्याही भूमिका आहेत.






