मराठीमधील अनेक कलाकार नवनवीन बॉलिवुड प्रोजेक्ट मध्ये दिसत आहेत त्यात अभिनेत्री अमृता खानविलकर हीच नाव आपसूक येतच. अमृता 2024 या वर्षात अनेक बॉलिवुड प्रोजेक्ट मध्ये दिसणार असल्याचा चर्चा होत असताना ती पुन्हा एकदा सोनी लिव्ह च्या 36 डे या नव्या वेब शो मधून दिसणार आहे. कायम वेगळ्या भूमिका साकारणारी अमृता या प्रोजेक्ट मध्ये नक्कीच वेगळी भूमिका साकारणार असल्याचं कळतंय.
वर्षाच्या सुरुवातीला अमृता ‘लुटेरे’ , ‘चाचा विधायक है हमारे 3’ या चित्रपटात दिसली होती आणि आता ती ” 36 डे ” मध्ये झळकणार आहे. अमृताने सोशल मीडिया वर पोस्ट शेअर करून ही खास बातमी प्रेक्षकांना दिली आहे. 36 डे मध्ये शारिब हाश्मी, नेहा शर्मा यांच्यासोबतीने अनेक कलाकार दिसणार आहेत.
अमृता नव्या प्रोजेक्ट बद्दल बोलताना म्हणाली की, ” एका हिंदी प्रोजेक्ट मध्ये पहिल्यांदा मी मराठी मुलीचं पात्र साकारत आहे. तसेच ही भूमिका नक्कीच इतर केलेल्या भूमिके पेक्षा वेगळी असणार आहे. विशाल फुरिया हा माझा चांगला मित्र आहे आणि त्याचा सोबत ही वेब सीरिज करायला मिळणं हा एक खास योग या निमित्ताने जुळून आला आहे. ३० ते ४० दिवस गोव्यात शूट केलेली ही वेब सीरिज माझ्यासाठी खूप कमालीचा अनुभव ठरली आहे. सोबतीला शारीब हाश्मी सारख्या कलाकारांसोबत एवढ्या जवळून काम करायला मिळाल ही खूप अभिमानाची गोष्ट आहे. 36 डे मध्ये शारिब ची भूमिका आणि माझी भूमिका विरुद्ध बाजूला आहे आणि ही दोन पात्र विचारांच्या बाहेरची आहेत.” अमृताची ही वेगळी भूमिका पाहायची प्रेक्षक वाट पाहत आहेत. ही वेब सीरिज लवकरच रिलीज होणार असून, प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
[read_also content=”सोशल मीडियावर कमेंट्स आणि ट्रोलिंग करणाऱ्यांविरुद्ध अमृता खानविलकरने व्यक्त केला संताप https://www.navarashtra.com/entertainment/amruta-khanwilkar-expressed-her-anger-against-those-who-comment-and-troll-on-social-media-entertainment-nrsk-522652/”]
त्याचदरम्यान अमृता आगामी काळात “कलावती’, ‘ललिता बाबर’, ‘पठ्ठे बापूराव’ या चित्रपटामधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सोशल मीडियावर अमृताच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अमृता कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते आणि तिच्या नवनवीन प्रोजेक्ट्स ची माहिती ती प्रेक्षकांना देत असते. आता 36 डे नक्की काय असणार? अमृताची कशी भूमिका साकारणार हे बघण उत्कंठावर्धक ठरणार आहे.