प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी(Mukesh ambani)यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानी (Anant ambani) याचा विवाह सोहळा राधिका मर्चंटसोबत (Radhika merchant) पार पडणार आहे. त्यांच्या विवाह सोहळ्याची जोरदार तयारी करण्यात आली आहे. राधिका आणि अनंत यांचा विवाह सोहळा १२ जुलैला पार पडणार असून त्यांची लग्नपत्रिका समोर आली आहे. (फोटो सौजन्य – ANI)
१२ जुलैपासून विवाह सोहळ्याला सुरुवात होणार असून १३ जुलै रोजी शुभ आर्शिवाद होणार आहेत. तर १४ जुलैला लग्नाचे रिशेप्शन पार पडणार आहे.गुजरातमधील जामनगरमध्ये मार्च महिन्यात अनंत आणि राधिका यांचे भव्य प्री – वेडिंग पार पडले. या सोहळ्याला अनेक दिग्गज कलाकारांनी हजेरी लावली होती. यावेळी इंटरनॅशनल कलाकारांनाही खास आमंत्रण देण्यात आले होते. तर अनेक विदेशी पाहुण्यांनी या सोहळ्याला उपस्थिती लावली होती.
कशी आहे शाही पत्रिका
विवाह सोहळ्यासाठी तयार करण्यात आलेल्या पत्रिकेचा रंग लाल आणि सोनेरी आहे. यामध्ये विवाह सोहळ्यातील संपूर्ण कार्यक्रमांची माहिती देण्यात आली आहे. राधिका अनंतचा विवाह सोहळा मुंबईमधील जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटरमध्ये पार पडणार आहे. हा विवाह अंबानी यांच्या कुटुंबातील अगदी खास ठरणार आहे.
पाहा पत्रिकेची झलक
Anant Ambani and Radhika’s Wedding to be held in Mumbai on 12th July at the Jio World Convention Centre in BKC. Wedding to be performed in accordance with the traditional Hindu Vedic way. The main wedding ceremonies will start on Friday, 12th July with the auspicious Shubh… pic.twitter.com/YKnaAIAs7o — ANI (@ANI) May 30, 2024
उत्साही अंबानी कुटुंब
मुकेश अंबानी यांच्या घरातील शेवटचे लग्न असल्याने सगळीकडे मोठा उत्साह आहे. मार्च महिन्यात पार पडलेल्या प्री वेडिंग सोहळ्याला करोडो रुपयांचा खर्च करण्यात आला होता. त्यानंतर २९ मे पासून पुन्हा एका राधिका आणि अनंत यांच्या प्री वेडिंग सोहळ्याला सुरुवात झाली आहे. त्यांचे प्री वेडिंग इटलीमधील ७००० करोड रुपयांच्या सगळ्यात महागड्या क्रूझ वर पार पडणार आहे.
करोडोंची उलाढाल
अनंत आणि राधिकाचा दुसरा प्री-वेडिंग सोहळा सध्या इटलीत चालू आहे. या प्री वेडिंग सोहळ्याला देशभरातील आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय उद्योगपती, नेते मंडळी, अनेक दिग्गज सेलिब्रिटी उपस्थित राहिले आहेत. मुकेश अंबानी यांच्या घरात पार पडलेले सर्वच सोहळे अगदी थाटामाटात पार पडले आहेत. इतर उद्योगपती आणि सेलिब्रिटींच्या तुलनेत मुकेश अंबानी यांनी आपल्या मुलांच्या विवाह सोहळ्यात करोडो रुपयांचा खर्च केला आहे.






