फोटो सौजन्य - सोशल मीडिया
बिग बॉसच्या घरातला नऊवा आठवडा बराच वादळी ठरला आहे. बिग बॉस मराठीच्या ग्रँड फिनालेला आता अवघे काही दिवसच शिल्लक राहिले आहेत. येत्या ६ ऑक्टोबरला ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या सीझनचा ग्रँड फिनाले अगदी दणक्यात पार पडणार आहे. या आठवड्यातला विकेंड खास ठरणार आहे, त्याचं कारण असं की, गेल्या काही सीझन्समधील सर्वाधिक चर्चेत राहिलेल्या स्पर्धकांना आमंत्रित करण्यात आलं आहे.
आजच्या एपिसोडमध्ये, राखी सावंत आणि अभिजीत बिचुकले यांच्यासोबत अनिल थट्टेही हजेरी लावणार आहेत. अनिल थत्तेंच्या विधानांनी आज ‘बिग बॉस मराठी’च्या घरात एकच खळबळ उडणार आहे. त्यामुळे आज घरात एकच कल्ला होणार, हे नक्की… काही तासांपूर्वीच कलर्स मराठीने त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर आजच्या एपिसोडमधील आणखी एक प्रोमो शेअर केलेला आहे. प्रोमोमध्ये अनिल थत्ते हात जोडत ‘बिग बॉस’च्या घरात प्रवेश करताना दिसत आहेत. प्रवेश करताच त्यांनी आपल्या खास शैलीत वर्षा उसगांवकर आणि निक्की तांबोळीशी संवाद साधला.
प्रोमोमध्ये ‘बिग बॉस’ अनिल थत्ते यांची ओळख करताना म्हणतात, “आता घरात येत आहे, अशी एक व्यक्ती ज्यांच्या विधानांनी नेहमीच खडबळ उडते.” पुढे अनिल थत्ते म्हणतात, “वर्षा… मी ताई वगैरे असं काही म्हणणार नाही. तरुणपणातील ड्रीम गर्ल ही होती.” तर थत्ते निक्कीबद्दल म्हणाले, “निक्की तू यूनिक आहेस. तुझ्याशिवाय आम्ही ‘बिग बॉस’ची कल्पना करू शकत नाही.” थत्ते असं बोलल्यानंतर निक्कीने त्यांचे हात जोडून आभार मानले. प्रोमो पाहून नेटकरी आजच्या एपिसोडसाठी कमालीचे उत्सुक असल्याचे पाहायला मिळत आहे.






