(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
भारतीय चित्रपटसृष्टीतील पॅन-इंडियन सुपरस्टार म्हणून नावारूपास आलेला प्रभास आपल्या मेहनतीने, समर्पणाने आणि दमदार अभिनयाने आज सर्वत्र लोकप्रिय झाला आहे. ‘बाहुबली’, ‘सालार’ आणि ‘राधे श्याम’सारख्या चित्रपटांनी तो केवळ दक्षिणेकडचा नाही, तर संपूर्ण देशाचा लाडका अभिनेता बनला आहे. आता त्याच्यासाठी आणि त्याच्या करोडो चाहत्यांसाठी यंदाचा ऑक्टोबर महिना खास ठरणार आहे. त्याचे चाहते त्याच्या प्रत्येक झलकसाठी आतुर असतात. मग ती मोठ्या पडद्यावर असो किंवा प्रत्यक्ष आयुष्यात.
यावर्षीचा ऑक्टोबर प्रभास आणि त्याच्या चाहत्यांसाठी ठरणार खास
सर्वप्रथम, ऑक्टोबर म्हणजे प्रभासचा वाढदिवस! दरवर्षी २३ ऑक्टोबर रोजी जगभरातील चाहते हा दिवस मोठ्या उत्साहात साजरा करतात. यावर्षीची खास गोष्ट म्हणजे त्याचा पहिला चित्रपट ईश्वर (2002) ज्याचे दिग्दर्शन जयंथ सी. परांजी यांनी केले होते आणि ज्यामध्ये श्रीदेवी विजयकुमार, शिवकृष्णा आणि रेवती यांनी भूमिका साकारल्या होत्या. प्रभासच्या वाढदिवसाच्या दिवशी 4K क्वालिटीमध्ये पुन्हा एकदा थिएटर्समध्ये प्रदर्शित होणार आहे. ही चाहत्यांसाठी एक अमूल्य संधी असेल, जेव्हा ते प्रभासच्या पहिल्या ऑन-स्क्रीन परफॉर्मन्सला पुन्हा मोठ्या पडद्यावर अनुभवू शकतील. गेल्या अनेक वर्षांपासून प्रभासचे चाहते त्याच्या वाढदिवसानिमित्त त्याच्या जुन्या चित्रपटांचे री-रिलीज आयोजन करत आहेत. मागच्या वर्षीच त्याचे सहा चित्रपट त्याच्या वाढदिवसाच्या निमित्ताने पुन्हा रिलीज करण्यात आले होते. ज्यावरून हे स्पष्ट होते की प्रेक्षक त्याच्यावर किती प्रेम करतात आणि त्याला किती मान देतात.
या ऑक्टोबरमधील आणखी एक विशेष आकर्षण ठरेल प्रभासच्या आगामी चित्रपट The RajaSaab चं इंट्रो गाणं. मरुथी लिखित आणि दिग्दर्शित हा हॉरर-कॉमेडी चित्रपट प्रभाससह संजय दत्त, निधी अग्रवाल आणि मालविका मोहनन यांना एकत्र आणतो आहे. जिथे हा चित्रपट ९ जानेवारी २०२६ रोजी प्रदर्शित होणार आहे, तिथे या ऑक्टोबरमध्ये प्रेक्षकांना या बहुप्रतिक्षित गाण्याच्या रूपात त्याची पहिली झलक मिळणार आहे. प्रभासच्या चाहत्यांसाठी हा क्षण म्हणजे एक उत्सवच ठरणार आहे.
प्रभाससारखा कलाकार, ज्याने सतत ब्लॉकबस्टर हिट्स दिल्या आहेत आणि भारतीय सिनेमाला नव्या उंचीवर नेले आहे, तो खरंच या प्रेमाचा आणि सन्मानाचा हकदार आहे. The RajaSaab चे इंट्रो गाणं केवळ एक सिनेमॅटिक मोमेंट नाही, तर त्याच्या योगदानाचं, प्रतिभेचं आणि त्याच्या चाहत्यांच्या अथांग प्रेमाचं प्रतीक आहे.