सध्या मराठी सिनेसृष्टीत अनेक नवनवीन विषयावर चित्रपट तयार होत आगेत. बायोपिक , थ्रिलर कॅामेडी असे एका ना अनेक चित्रपट सध्या प्रेक्षकांच्या भेटीस येत आहेत. ज्यांना प्रेक्षकांचाही चांगला प्रतिसाद मिळत आहे. आता एक नवा कोरा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटस येणार आहे ज्याचं नाव आहे फकिरा. साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे (Annabhau Sathe) यांनी लिहिलेल्या ‘फकिरा’ (Fakira) या कादंबरीला 1961 मध्ये महाराष्ट्र सरकारचा उत्कृष्ट कादंबरीचा मिळाला होता. आता अण्णाभाऊ साठेंच्या याच कादंबरीची गोष्ट आता रुपेरी पडद्यावर साकारली जाणार आहे. फकिरा हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. भाऊराव कऱ्हाडे यांनी या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे.
[read_also content=”बॉलीवूडनंतर टॉलिवूड गाजवण्यास अक्षय कुमार सज्ज, पहिल्या तेलुगू चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात! https://www.navarashtra.com/movies/akshay-kumar-starts-dhooting-for-his-fiest-telugu-film-kannappa-nrps-524279.html”]
फकिरा चित्रपटाचं पोस्टर नुकतच लॉन्च करण्यात आलं असून या सिनेमात अनेक दिग्गज कलाकारांची मांदियाळी पाहायला मिळणार आहे. त्यामुळे सध्या प्रेक्षकांना या चित्रपटाची उत्सुकता प्रेक्षकांना लागून राहिली आहे.
या चित्रपटात नाना पाटेकर, सयाजी शिंदे, प्रसाद ओक, मृणाल कुलकर्णी, मकरंद देशपांडे, नागेश भोसले, संदीप पाठक, कमलेश सावंत, किरण माने हे कलाकार दिसणार आहे. रुद्र ग्रुप आणि चित्राक्षी निर्मित या चित्रपटाचे दिग्दर्शन भाऊराव नानासाहेब कऱ्हाडे यांनी केलं आहे. त्याचप्रमाणे या चित्रपटाची पटकथा आणि संवाद मंदार जोशी आणि भाऊराव कऱ्हाडे यांनी लिहिले आहेत. पण या चित्रपटासाठी प्रेक्षकांना थोडी वाट पहावी लागणार आहे. कारण हा सिनेमा पुढच्या वर्षात म्हणजेच 2025 मध्ये प्रदर्शित होणार आहे.