अभिनेता अंशुमन विचारेने (Anhsuman Vichare) गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर त्याला मुलगा झाल्याची बातमी दिली. यासोबतच त्याने एक लिंक शेअर केली, यात त्याची लेक अन्वीनं(Anvi Vichare) बाळाला मांडीवर घेतल्याचं दिसत होतं. त्यानंतर त्याला मुलगा झाल्याची बातमी सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल (Anshuman Vichare Viral Story) झाली. त्यानंतर आता अंशुमनची पत्नी पल्लवीचा (Pallavi Vichare Request) एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत तिनं हा सगळा एप्रिल फूलचा प्लॅन होता आणि त्यांना अन्वी ही एकच मुलगी आहे. एप्रिल फूलचा प्लॅन महागात पडला असे त्याच्या पत्नीने सांगितले.
पल्लवीने युट्यूबवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडीओत ती म्हणाली, “१ एप्रिलला मी गंमत म्हणून एक व्हिडिओ शेअर केला होता. अन्वीला भाऊ झाला आहे असं सांगितलं. मात्र यानंतर अंशुला मेसेज, फोन आले. आम्ही अंशुला सांगितलं होतं की, हे एप्रिल फूल आहे म्हणून सांग. यानंतर अंशुमनला खूप कॉल, मेसेज आले त्याचा त्याला खूप त्रास होतोय. त्यामुळे माझी विनंती आहे की, हे सगळं थांबवा. आम्हाला एकच मुलगी आहे. आम्ही आधीच ठरवलं आहे की, जे काही असेल ते आपल्याला एकच असेल मग मुलगा असो किंवा मुलगी.” त्यामुळे हे सगळं थांबवण्याची विनंती पल्लवीने या व्हिडिओच्या माध्यमातून केली आहे.
[read_also content=”अवकाळी पावसाचा शेतकऱ्यांना फटका, बेदाण्यासाठी ठेवलेल्या द्राक्षांच नुकसान https://www.navarashtra.com/maharashtra/grapes-kept-for-raisins-are-damage-becasuse-of-untimely-rains-in-solapur-nrps-264973/”]
अंशुमनची मुलगी अन्वी सोशल मीडिया चांगलीच लोकप्रिय आहे. तिचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतात. नुकतचं अंशुमनने नवीन घर घेतलं आहे. ह्या नव्या घराची ओळख अन्वीने तिच्या युट्युबवरील व्हिडिओतून करून दिली होती.