Israel Iron Beam Failure : इस्रायलची सर्वात महागडी लेझर सिस्टीम ड्रोन रोखण्यात अपयशी! ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया )
Iron Beam vs Hezbollah Drones : इस्रायलने जगाला असा दावा केला होता की, त्यांच्याकडे आता एक अशी ‘लेझर’ शक्ती आहे जी कोणत्याही रॉकेट किंवा ड्रोनला काही सेकंदात भस्म करेल. मात्र, लेबनान सीमेवर हिजबुल्लाहसोबत सुरू असलेल्या युद्धात या ‘आयर्न बीम’ (Iron Beam) सिस्टीमचे पितळ उघडे पडले आहे. ज्या तंत्रज्ञानावर इस्रायलने १० वर्षे मेहनत घेतली आणि अब्जावधी रुपये खर्च केले, ते तंत्रज्ञान आता युद्धभूमीवर सर्वात कमकुवत दुवा ठरत आहे.
इस्रायलच्या संरक्षण मंत्रालयाने राफेल आणि एल्बिट या कंपन्यांसोबत २ अब्ज इस्रायली शेकेलचा करार करून आयर्न बीमचे उत्पादन वाढवण्याचा निर्णय घेतला होता. या सिस्टीमचा मुख्य फायदा असा सांगण्यात आला होता की, एका रॉकेटला पाडण्याचा खर्च फक्त काही डॉलर्स असेल. मात्र, वास्तवात या सिस्टीमची कामगिरी अत्यंत खराब आहे. हिजबुल्लाहने पाठवलेले साधे ड्रोन पाडण्यासाठीही आयर्न बीमला तारेवरची कसरत करावी लागत आहे. अनेक वेळा लेझर सिस्टीम फेल झाल्यावर इस्रायली सैन्याला हेलिकॉप्टर किंवा साध्या रायफल्सचा वापर करून ड्रोन पाडावे लागत आहेत.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Strait Of Hormuz: समुद्रातील ती ‘अदृश्य’ भिंत! भारतीय टँकर झालं गायब आणि प्रगटलं थेट मुंबईत; वाचा कसा चुकवला सुरक्षा घेरा?
आयर्न बीम ही प्रणाली १०० किलोवॅटच्या लेझर बीमवर आधारित आहे. हे लेझर लक्ष्यावर काही सेकंद प्रकाश टाकून उष्णता निर्माण करते आणि इंजिन निकामी करते. पण यामध्ये एक मोठी तांत्रिक अडचण आहे. लेझरला अचूक मारा करण्यासाठी वातावरण स्वच्छ असणे आवश्यक आहे. तज्ज्ञांच्या मते, धुके, धुळीचे वादळ किंवा ढगाळ वातावरण असल्यास लेझरची शक्ती विखुरली जाते आणि ती ड्रोनला स्पर्शही करू शकत नाही. सौदी अरेबियाने चीनकडून घेतलेली अशीच यंत्रणा वाळवंटातील उष्णतेमुळे निकामी ठरली होती, तोच अनुभव आता इस्रायलला येत आहे.
🇮🇱🇱🇧 Israel’s “Iron Beam” laser system has destroyed a suicide drone launched from Lebanon pic.twitter.com/lbgHwSTMyu — Visioner (@visionergeo) March 2, 2026
credit – social media and Twitter
सोशल मीडियावर अनेकदा खोटे व्हिडिओ पसरवले जातात की आयर्न बीमने मोठी क्षेपणास्त्रे नष्ट केली. मात्र, तज्ज्ञांनी स्पष्ट केले आहे की, आयर्न बीममध्ये इराणच्या ‘फतेह’ सारखी हाय-स्पीड बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे रोखण्याची क्षमता अजिबात नाही. ही यंत्रणा फक्त कमी उंचीवर उडणाऱ्या आणि संथ गतीने चालणाऱ्या छोट्या ड्रोनसाठी तयार करण्यात आली होती, परंतु तिथेही तिला संघर्ष करावा लागत आहे. इस्रायलचे माजी हवाई दल कमांडर ब्रिगेडियर जनरल रान कोचाव यांनी स्पष्ट केले की, आयर्न बीम अजूनही सुरुवातीच्या टप्प्यात आहे आणि तिला आयर्न डोमची जागा घेणे अशक्य आहे.
⚡HISTORIC: For the first time ever, Israel used the Iron Beam to intercept rockets fired by Hezbollah. pic.twitter.com/DU63REU22k — Israel War Room (@IsraelWarRoom) March 2, 2026
credit – social media and Twitter
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Fuel Crisis: 30 दिवस तेल पुरवठा बंद! होर्मुझमध्ये इराणची प्रलयकारी सापळ्यांची उभारणी; अमेरिकन नौदलाचा ‘एस्कॉर्ट’ प्लॅन फेल
इस्रायलने आयर्न बीमला आयर्न डोममध्ये समाविष्ट करण्याचा प्रयत्न केला होता, जेणेकरून मोठ्या संकटांना रॉकेटने आणि छोट्या धोक्यांना लेझरने रोखता येईल. मात्र, सध्याची परिस्थिती पाहता इस्रायलला या तंत्रज्ञानावर अधिक काम करण्याची गरज आहे. तोपर्यंत हिजबुल्लाहच्या स्वस्त ड्रोनने इस्रायलच्या अब्जावधींच्या या ‘लेझर’ स्वप्नाला मोठा तडा दिला आहे, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.
Ans: आयर्न बीम ही इस्रायलची लेझर-आधारित हवाई संरक्षण प्रणाली आहे, जी ड्रोन आणि लहान रॉकेट नष्ट करण्यासाठी तयार करण्यात आली आहे.
Ans: खराब हवामान (धुके, धूळ) आणि लेझरची मर्यादित रेंज यामुळे ही यंत्रणा ड्रोनवर अचूक मारा करण्यात अपयशी ठरत आहे.
Ans: नाही, आयर्न बीममध्ये हाय-स्पीड बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे रोखण्याची क्षमता नाही; ती फक्त लहान यूएव्ही (UAV) साठी प्रभावी ठरू शकते.






