ए. आर. रेहमानच्या समर्थनार्थ सायरा बानो यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाल्या, "त्यांचं नाव तुम्ही..."
भारताचे लोकप्रिय आणि ऑस्कर विजेते संगीतकार ए. आर. रेहमान गेल्या काही दिवसांपासून त्याच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे. लग्नाच्या २९ वर्षांनंतर ए. आर. रेहमान आणि सायरा बानू यांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. संगीताच्या जादूने संपूर्ण जगाला मोहून टाकणाऱ्या रहमान यांच्या वैयक्तिक आयुष्यात हा मोठा बदल अचानक का घडला, याची चर्चा सुरू झाली.
रेहमानच्या घटस्फोटानंतर त्यांच्या म्युझिक बँडमधील सदस्य मोहिनी डेनेही घटस्फोटाची घोषणा केली. त्यानंतर लोकांनी ए. आर. रेहमानचे नाव मोहिनीसोबत जोडण्यास सुरुवात केली. सोशल मीडियावर दोघांनाही प्रचंड ट्रोल केले आहे. या सर्व चर्चांदरम्यान सायरा बानोने अर्थात गायकाच्या पत्नीने या प्रकरणावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. तिने एक निवेदन जारी केले आहे, त्यातून तिने प्रतिक्रिया दिली आहे.
निकालानंतर कंगना रणौतची प्रतिक्रिया, उद्धव ठाकरेंवर केली सडकून टीका
सायरा बानोची वकील वंदना शाह यांनी एक निवेदन जारी केले आहे. ज्यामध्ये सायरा पती ए. आर. रहमानला सपोर्ट करताना दिसली. या निवेदनात सायरा म्हणाली, “सध्या मी मुंबईत राहत असून थोडी फिजकली विक आहे. त्यामुळे मी आतापर्यंत गप्पच होती. पण मी सर्व युट्यूबर्स आणि तमिळ माध्यमांना आवाहन करते की, त्यांनी कृपया ए. आर. रेहमानबद्दल कोणत्याही चुकीच्या गोष्टी पसरवू नका. माझ्या प्रकृतीच्या समस्येमुळे मला चेन्नई सोडावे लागले. मी चेन्नईत नसते तर मी कुठे गेले ? असा प्रश्न तुम्हाला सहाजिकच पडला असेल.”
विशाखा सुभेदारच्या पतीचं अभिनयविश्वात पुनरागमन! अभिनेत्रीने खास पोस्ट शेअर करत दिल्या शुभेच्छा
सायरा निवेदनात पुढे म्हणाली, “रेहमान जगातील सर्वोत्तम व्यक्ती आहे. तो एक मौल्यवान व्यक्ती आहे. सर्वांना मी विनंती करते की, त्याच्या सध्याच्या वाईट काळात मी तुम्ही त्याला सपोर्ट करूया. तो आयुष्यभर माझ्यासोबत राहील याचा मला अतुट विश्वास आहे. जोपर्यंत आम्ही अधिकृत काहीही म्हणत नाही तो पर्यंत जसे आहे तसेच राहू द्यावेत, असे मी सर्वांना आवाहन करते. कृपया आमच्या गोपनीयतेचा आदर करा, त्याचे समर्थन करा. ए. आर. रेहमानचं नाव इतर कोणाशीही जोडणे थांबवा. तो खरंच खूप चांगला माणूस आहे. त्याचं नाव खराब करू नका…” दरम्यान, ए. आर. रेहमान आणि सायरा बानो खतिजा, रहीमा आणि अमीन या तीन मुलांचे पालक आहेत.