(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
रिअॅलिटी शो ‘Rise And Fall’ आता अंतिम टप्प्यात पोहोचत आहे आणि स्पर्धा दिवसेंदिवस अधिकच चुरशीची होत चालली आहे. रोज नवनवीन टास्क्स, ट्विस्ट्स आणि नियमांतील बदल यामुळे हा शो सतत प्रेक्षकांच्या चर्चेचा विषय ठरतो आहे.
या शोमध्ये ‘बिग बॉस मराठी ५’चा लोकप्रिय स्पर्धक अरबाज पटेल देखील सहभागी झाला असून, Rise And Fall शोच्या फायनलसाठीचं टिकीट जिंकून अरबाज पटेलनं पहिला फायनलिस्ट होण्याचा मान पटकावला आहे. नुकत्याच पार पडलेल्या एका धक्कादायक टास्कमध्ये स्पर्धकांना आपल्या गटातीलच सर्वात कमकुवत सदस्याला फिनालेच्या शर्यतीतून बाहेर काढावं लागलं.
या टास्कमध्ये पहिली मनीषा राणी बाद झाली, त्यानंतर धनश्री वर्मा आणि मग अर्जुन बिजलानीलाही स्पर्धा सोडावी लागली.एका मागोमाग एक स्पर्धक बाहेर पडत असताना, अखेरच्या टास्कसाठी केवळ दोन स्पर्धक उरले होते ते म्हणजे अरबाज पटेल आणि बाली. या निर्णायक टास्कमध्ये अरबाजने आपले सहकारी म्हणून आकृती आणि नयनदीप यांची निवड केली, तर बालीने आरुष आणि आदित्य याच्यावर विश्वास दाखवला. शेवटच्या टास्कमध्ये अरबाज पटेलला फायनलसाठी पात्र ठरवण्यात आलं. स्पर्धक धनश्रीबरोबरची त्याची जवळीक आणि दोघांमधील केमिस्ट्रीमुळे ते दोघे प्रेक्षकांच्या चर्चेचा विषय ठरले.
शोमध्ये सर्वात मोठा ट्विस्ट तेव्हा आला, जेव्हा अरबाज पटेलच्या गर्लफ्रेंड निक्की तांबोळी हिची अचानक घरात झालेली एन्ट्री! निक्की तांबोळी घरात आली आणि वातावरणच बदलून गेलं. येताच तिनं थेट अरबाजच्या खेळावर प्रश्न उपस्थित केले आणि त्याला काही महत्त्वाचे सल्ले दिले होते. त्यानंतर अरबाजने तिच्या सल्ल्याचा योग्य वापर करून, या आठवड्यातला टास्क अत्यंत चतुराईने पूर्ण केल्याचे दिसले.
निक्कीने दिलेला फीडबॅक त्याच्या खेळात बदल घडवणारा ठरला. या कठीण टास्कमध्ये आपली बुद्धिमत्ता आणि रणनीती दाखवत अरबाज पटेलने फायनलचं टिकीट जिंकून पहिला फायनलिस्ट होण्याचा मान मिळवला. शोचा शेवट जवळ आला असताना आता उरलेल्या स्पर्धकांमध्ये अंतिम तिकीटासाठी अधिकच तीव्र स्पर्धा पाहायला मिळणार आहे. अरबाज फायनलमध्ये काय करणार? आणि कोण त्याला टक्कर देणार? हे पाहणं रंजक ठरणार आहे.