Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Delhi Blast |
  • Political news |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

बाईपण जिंदाबाद! खोट्या आरोपाने उद्ध्वस्त अनुराधा, वेदनेचा प्रवास प्रेक्षकांच्या भेटीला

सध्या ‘बाईपण जिंदाबाद’ या सिरीजमधून महिलांचे वेगवेगळे पैलू आणि समस्या उत्तमरित्या प्रेक्षकांसमोर येत आहेत आणि आता या सिरीजमधील ‘अनुराधा’ प्रेक्षकांसमोर येणार आहे. काय आहे ही कथा जाणून घ्या

  • By दिपाली नाफडे
Updated On: Nov 20, 2025 | 10:57 PM
बाईपण जिंदाबादमध्ये अनुराधाची कहाणी प्रेक्षकांच्या भेटीला

बाईपण जिंदाबादमध्ये अनुराधाची कहाणी प्रेक्षकांच्या भेटीला

Follow Us
Close
Follow Us:
  • बाईपण जिंदाबादमधील स्त्री चा वेगळा पैलू 
  • अनुराधा येतेय प्रेक्षकांच्या भेटीला
  • उर्मिला कोठारे साकारणार प्रमुख भूमिका  
कलर्स मराठीवरील ‘बाईपण जिंदाबाद’ ही विशेष भागांची मालिका सध्या प्रचंड चर्चेत आहे. मराठी टेलिव्हिजन विश्वात गोष्ट सादर करण्याचा हा नवा प्रयोग प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरला आहे. बाईपण… एक शब्द, पण त्यात किती अर्थ दडलेले असतात. एक स्वतंत्र जग त्यात  सामावलेलं असतं. तिच्या मनात भावनांचे महासागर उसळत असतात, निर्णयांचे ओझे दडलेले असते, आणि अनेक संघर्षांना ती शांतपणे सामोरी जात असते मात्र हे जगाला दिसतच नाही. 

काही वेळा थेट संबंध नसला तरी तिच्यावर आरोपांच्या  फैरी झाडणे, व्यवस्थेचा बळी ठरवणे हे घडत राहते. तिला मुळापासून उपटून टाकण्याचे, तिचे खच्चीकरण करण्याचे प्रयत्न होतच राहतात. पुरुषप्रधान संस्कृतीत बाईने थोडं स्वतंत्र जगण्याचा प्रयत्न केला की ती ‘चुकीची’ ठरते. तिच्या उंच भरारीला स्वप्नांचे पंख असले तरी ते कापण्याचा प्रयत्न केला जातो. तरीही ती उठते… तुटलेल्या स्वप्नांच्या धुळीतून उभी राहते. मात्र त्यासाठी तिला चुकवावी लागणारी किंमत खूप मोठी असते… याला उत्तर आहे का? हाच शोध कलर्स मराठीच्या बाईपण जिंदाबाद मधील ‘अनुराधा’ या कथेत घेतला आहे. 

Colors Marathi Serial: ‘बाईपण जिंदाबाद!’चा नवा टप्पा, ‘शर्ट’मध्ये दिसणार बदलत्या स्त्रीविश्वाची कथा

आजच्या स्त्रीची ही गोष्ट इतर स्त्रीप्रधान कथांपेक्षा वेगळी 

अनुराधा साधी, सरळ, आत्मविश्वासू स्त्री. पण एका खोट्या आरोपाने तिचं आयुष्य उद्ध्वस्त होतं. दोन वर्षांनी ती जेलमधून बाहेर पडली तरी समाजाने तिला ‘जन्मठेप’ सुनावलेली असते—भिंती बदलतात, पण चौकट तशीच राहते. नाती तुटतात, ओळख हरवते, आणि पायाखालची जमीन हलते.

अशावेळी अनुराधा जे काही करते ते मुळापासून अनुभवण्यासारखे आहे. प्रत्येक अपमान, शंका, कुजबुज ओलांडत ती काय करते, ज्याने समाजाच्या व तुरुंगाच्या बेड्या कशा तुटतात—याची ही जगावेगळी गोष्ट. ही केवळ तुरुंगातून सुटण्याची नाही—तर त्या क्षणाची गोष्ट आहे, जिथे स्त्रीचे अस्तित्व पणाला लागते. तो क्षण प्रत्येक स्त्रीने जाणून घ्यावा,समजून घेऊन,समृद्ध व्हावा असा आहे, हा प्रवास अनुभवण्यासाठी अनुराधा येतेय आपल्या भेटीला. 

वेदनेचा सूर 

अनुराधाच्या कथेतला वेदनेचा सूर खोल आहे. जेलमधून परत आलेली एक स्त्री आणि त्यातून उलगडत जाणारे स्त्रीत्वाचे प्रश्न बाईपणाचं वेगळं रूप समोर आणतात. हे प्रश्न खरं तर प्रत्येक स्त्रीने विचारण्यासारखे, आपल्या जगण्यात असले आहेत  तरी अनुराधासारखे चॅलेंजिंग क्षण न आल्याने ते दिसत नाहीत.विचारले जात नाहीत., अशा न बोलेल्या, न दिसणाऱ्या पण खोलवर असलेल्या प्रश्नांमधून ही कथा आकार घेते. कोर्टाने दिली ३ वर्षांची शिक्षा, पण समाजाने सुनावली ‘जन्मठेप’. अनुराधा असं का म्हणते हे अनुभवण्यासाठी ही कहाणी प्रत्येकाने पाहावी असेच म्हणावे लागेल. बाईपण जिंदाबाद! अनुराधा प्रेक्षक २३ नोव्हेंबर, रात्री ८ वा कलर्स मराठीवर पाहू शकणार आहेत आणि महिलेच्या विविध त्रासाच, पैलूंचा अनुभव प्रेक्षकांना घेता येणार आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. 

Colours Marathi Serial:‘बाईपण जिंदाबाद’ नवीन कार्यक्रम प्रेक्षकांच्या भेटीला, ‘या’ सात लोकप्रिय अभिनेत्री एकत्र दिसणार

Web Title: Baipan zindabad on colors marathi urmila kothare as anuradha new series

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 20, 2025 | 10:57 PM

Topics:  

  • colors marathi
  • marathi serial update
  • New Marathi Serial

संबंधित बातम्या

Sun Marathi New Serial: “मी संसार माझा रेखिते”च्या प्रोमोवर प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; हरीश दुधाडे साकारणार मुख्य भूमिका
1

Sun Marathi New Serial: “मी संसार माझा रेखिते”च्या प्रोमोवर प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; हरीश दुधाडे साकारणार मुख्य भूमिका

Colors Marathi Serial: नियतीचा खेळ सुरू; ‘आई तुळजाभवानी’ मध्ये जगदंबा आणि महादेव यांची अद्भुत भेट
2

Colors Marathi Serial: नियतीचा खेळ सुरू; ‘आई तुळजाभवानी’ मध्ये जगदंबा आणि महादेव यांची अद्भुत भेट

Colors Marathi Serial: ‘बाईपण जिंदाबाद!’चा नवा टप्पा, ‘शर्ट’मध्ये दिसणार बदलत्या स्त्रीविश्वाची कथा
3

Colors Marathi Serial: ‘बाईपण जिंदाबाद!’चा नवा टप्पा, ‘शर्ट’मध्ये दिसणार बदलत्या स्त्रीविश्वाची कथा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.