(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
कलर्स मराठी नेहमीच मराठी प्रेक्षकांच्या मनाला भिडणाऱ्या आणि समाजाच्या आरशात स्वतःचं प्रतिबिंब दाखवणाऱ्या कथा सादर करत आलं आहे. ‘बाईपण जिंदाबाद’ ही मालिका स्त्रीच्या असंख्य रूपांना, तिच्या त्यागाला, संघर्षाला आणि सामर्थ्याला सलाम करणारी आहे. ती आई आहे जी मुलांच्या आनंदात स्वतःचं आयुष्य शोधते; ती पत्नी आहे जी पतीच्या प्रत्येक संकटात खंबीरपणे उभी राहते. ‘आईपण’ ही एक भावना आहे जी शब्दांच्या पलीकडे जाते जी जपते, काळजी घेते, आणि कधी कधी त्याच प्रेमातून बंधनंही घालते.
प्रत्येक स्त्रीच्या अस्तित्वात माया, मातृत्व आणि सामर्थ्य दडलेलं असतं. ती कधी शिस्तबद्ध असते, कधी प्रेमळ, कधी कडक पण आईची जागा कुणीच घेऊ शकत नाही. ती आपल्या मुलासाठी काहीही करू शकते. आईचं प्रेम सारखं असतं, पण ते व्यक्त करण्याची पद्धत वेगळी असते. दोन भिन्न स्वभावाच्या, पण समान प्रेमाने बांधलेल्या आईंची भावनिक कहाणी सांगते ‘मच्छीका पानी’. ही हृदयस्पर्शी गोष्ट. या कथेमध्ये सुचित्रा बांदेकर, शलाका पवार, तेजस बर्वे, विनायक माळी मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या कथेतील दोन्ही आईंमधील सामान धागा म्हणजे त्या दोघीही आपलं स्वप्न आपल्या मुलाने पूर्ण करावं अशी इच्छा उराशी बाळगून आहेत. त्यांच्या या इच्छा कशा पूर्ण होणार याची ही कथा कधी खळखळवून हसवणारी तर कधी डोळ्याच्या कडा ओलावणारी दे धमाल गोष्ट आहे.
‘बाईपण जिंदाबाद’ ही केवळ मनोरंजनाची मालिका नाही, तर प्रत्येक स्त्रीच्या आयुष्याचं प्रतिबिंब आहे तिच्या अश्रूंमागचं सामर्थ्य, तिच्या शांततेतला आवाज, आणि तिच्या हसण्यात दडलेली जिद्द यांचं दर्शन घडवणारी ही एक हृदयस्पर्शी सफर. कलर्स मराठीच्या या मालिकेतून स्त्रीच्या भावविश्वाचं एक नवं पर्व उलगडतं मालिकेच्या याच श्रुंखलेत आता येतेय आणखी एक भावनिक आणि विचार करायला लावणारी गोष्ट ‘मच्छीका पानी’. ही आहे दोन आईंची कहाणी… दोन वेगळ्या जगांतील पण मातृत्वाच्या एकाच नात्याने जोडलेल्या. मच्छीका पानी कथेत सुचित्रा बांदेकर साकारत आहे एका करिअर-ड्रिव्हन, स्वतंत्र, आणि स्वप्नाळू आईची भूमिका. जी ठाम आहे, ध्येयवेडी आहे. तिच्या मुलाची भूमिका साकारत आहे तरुण आणि प्रतिभावान तेजस बर्वे, जो स्वतःची ओळख शोधणारा आहे, पण आईच्या स्वप्नांच्या सावलीत अडकलेला आहे. जी आपल्या वडिलांच्या आयकॉनिक हॉटेलचं पुनरुज्जीवन करण्याचं स्वप्न पाहते. तिचं स्वप्न तिच्या मुलाने पूर्ण करावे अशी तिची इच्छा आहे त्यामुळे ती तिच्या मुलाच्या करिअरबद्दल विशेष काळजी करते आहे.
‘मुंबई पुणे मुंबई 4’ ची घोषणा; 15 वर्षांनंतर प्रेक्षकांना पुन्हा भेटणार गौरी–गौतम
या कथेत एक वेगळं रंगत आणते शलाका पवार , जी साकारते एका उत्साही, स्पष्टव्यक्ती आणि मनमोकळ्या कोळी स्त्रीची व्यक्तिरेखा. समुद्राच्या लाटांशी खेळणारी, पण मनानं तितकीच दृढ. तिचे म्हणणे आहे आपल्या मुलाने फूड इंफ्लून्सर न बनता त्याचा पारंपरिक व्यवसाय पुढे न्यावा. एकीकडे शहरी तर दुसरीकडे किनाऱ्याची जेव्हा या दोन आई एकमेकींच्या नजरेतून ‘आईपण’ नव्याने जाणू लागतात, तेव्हाच त्या भावनेची खरी कसोटी लागते. पण, जेव्हा या दोन आई एकमेकींना भेटतील तेव्हा काय घडेल ? दोन आईंच्या या प्रवासातून उमगतं प्रेम म्हणजे जपणं नव्हे, तर स्वीकारणं आहे. हा प्रवास आहे आई आणि मुलाच्या नात्यातील अपेक्षा, संघर्ष आणि समजुतींचा.






