Bigg Boss 18 मध्ये कोणकोणते स्पर्धक असणार ? गुणरत्न सदावर्ते, शिल्पा शिरोडकर अन्... वाचा यादी
टेलिव्हिजनवरचा प्रसिद्ध रिॲलिटी शो बिग बॉसची प्रेक्षकांमध्ये कमालीची क्रेझ पाहायला मिळत आहे. मराठीनंतर आता लवकरच हिंदीतही ‘बिग बॉस’ शो सुरू होणार आहे. सध्या बिग बॉस मराठीचा पाचवा सीझन सुरू आहे, तर हिंदीमध्ये आता अठरावा सीझन सुरू आहे. गेल्या काही दिवसांपूर्वीच शोचा प्रोमो रिलीज झाला होता. तेव्हापासून चाहत्यांमध्ये, शोची क्रेझ पाहायला मिळत आहे. बिग बॉस हिंदीचं होस्टिंग सलमान खान करणार असून आता बिग बॉसच्या सीझन १८ साठी चाहते प्रचंड उत्सुक आहेत. ‘बिग बॉस 18’चा प्रोमो समोर आल्यानंतर यंदाच्या पर्वाची थीम काय असेल ? शिवाय स्पर्धकांचीही नावं समोर आली आहेत.
हे देखील वाचा – करीना कपूरचा ‘द बर्किंघम मर्डर’नंतर ठरणार करिअरमधील ‘हा’ सर्वात मोठा चित्रपट!
मीडिया रिपोर्ट्सनुसार, ‘बिग बॉस 18’चा पहिला एपिसोड ५ ऑक्टोबरला प्रीमियर केला जाईल. ‘खतरों के खिलाडी’च्या ग्रँड फिनावलेवेळी पहिल्या कंटेस्टंटचंही नाव घोषित केले जाऊ शकते. बिग बॉसच्या १८ व्या सीझनसाठी चाहते खूपच एक्सायटेड आहेत. शोच्या विश्वसनीय सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आणि बिग बॉससंबंधित माहिती देणाऱ्या सोशल मीडिया हँडलने दिलेल्या माहितीनुसार १४ स्पर्धकांची यादी जाहीर करण्यात आली आहे. ही यादी अधिकृत नसून सोशल मीडियावर या चेहऱ्यांची जोरदार चर्चा होत आहे.
हे देखील वाचा- बॉलीवूडला आपल्या तालावर नाचवणारा माणूस, DJ Yogi माहित्ये का तुम्हाला?
ईश कोप्पिकर
धीरज कपूर
कनिका मान
निया शर्मा
शोएब इब्राहिम
चाहत पांडे
श्रीरामा चंद्रा
दिग्विजय राठी
कशिश कपूर
जान खान
सोनल वेंगुर्लेकर
मॅक्सटर्न
रित्विक धनजानी
समीरा रेड्डी
बिग बॉस हिंदीसंबंधित माहिती देणाऱ्या एक्स युजर्सने दिलेल्या माहितीनुसार, ही स्पर्धकांची यादी अद्याप अधिकृत नाही. या स्पर्धकांच्या यादीमध्ये, तहलका प्रँक म्हणजेच सन्नी आर्याची पत्नी दीपिका आर्याचे नावही चर्चेत आहे. अधिकृत यादी शोकडून अद्याप जाही केलेली नाही.