जगप्रसिद्ध ब्रँड Nestle च्या मिल्क प्रॉडक्टमध्ये आढळले विषारी पदार्थ
नेस्लेने दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्या उत्पादनांमध्ये वापरल्या जाणाऱ्या एका कच्च्या मालामध्ये तांत्रिक बिघाडामुळे दूषित घटक मिसळले असण्याची शक्यता आहे. या विषारी घटकामुळे लहान मुलांना उलट्या, मळमळ आणि पोटाचे विकार – होण्याची भीती वर्तवली आहे. विशेष म्हणजे, हे विषारी घटक उष्णतारोधक – असल्याने उकळत्या पाण्यानेही नष्ट होत नाहीत, असे ब्रिटनच्या फूड स्टैंडर्ड्स – एजन्सीने (एफएसए) स्पष्ट केले आहे.
कंपनीचे पालकांना आवाहन
कंपनीने स्पष्ट केले आहे की, अद्याप कोणत्याही बालकाला या आहारामुळे बाधा झाल्याचे वृत्त नाही. तरीही, सुरक्षिततेचा उपाय म्हणून पालकांनी उत्पादनाच्या डब्यावरील ‘बैंच कोड’ तपासावा आणि जर तो रिकॉल केलेल्या यादीत असेल, तर मुलांना ते अन्न देऊ नये. बांधित उत्पादने परत करून ग्राहकांना पूर्ण पैसे परत दिले जातील, असेही कंपनीने नमूद केले आहे.
कंपनीचे कोणते प्रोडक्ट्स प्रभावित निघाले?






