रितेश देशमुखने कॅप्टन झाल्यानंतर सूरज चव्हाणचे केले कौतुक, 'भाऊच्या धक्का'वर दिला महत्वपूर्ण सल्ला
बिग बॉसच्या घरात सहाव्या आठवड्यातला कॅप्टन गोलीगत सूरज चव्हाण झाला आणि सर्वत्र एकच चर्चा झाली. सूरज चव्हाण कॅप्टन झाल्यामुळे एकंदरीतच घरातले सर्वच स्पर्धक कमालीचे आनंदीत आहेत. घरातल्या स्पर्धकांमध्ये तर आनंदाचं वातावरण तर आहेच पण शिवाय नेटकऱ्यांमध्येही आनंदाचं वातावरण आहे. अशातच आता सहावा आठवडा संपत आला असून उद्यापासून सातव्या आठवड्याला सुरूवात होणार आहे. आज ‘भाऊचा धक्का’ पार पडणार आहे. आजच्या एपिसोडमध्ये रितेश देशमुख अनेक स्पर्धकांची कानउघडणी करणार आहे तर, काही स्पर्धकांचे कौतुक करणार दिसणार आहे.
हे देखील वाचा – शिवानी रांगोळेने गणरायाला घातलं साकडं; म्हणाली, “मुलांच्या आधी पालकांना…”
सध्या सोशल मीडियावर आजच्या एपिसोडचा प्रोमो व्हायरल होत आहे. व्हायरल होणाऱ्या प्रोमोमध्ये, आजच्या भाऊच्या धक्क्यावर रितेश कॅप्टन सूरजचं अभिनंदन करणार आहे. त्यावर सूरज म्हणतोय,”गणपती बाप्पा आणि माझ्या टीमने माझी इच्छा पूर्ण केली आहे. माझ्या टीमच्या पाठिंब्यामुळे मी कॅप्टन झालो आहे.” “सूरज या कॅप्टनपदाचा कॉन्फिडन्स घ्या. या आठवड्यात जसं बोलत होतात तसं बोलत राहा… काम करत राहा आणि स्टँड घ्या. कॅप्टन म्हणजे जबाबदारी आहे.” असं म्हणत रितेश देशमुखने कॅप्टन सूरज चव्हाणला मोलाचा सल्ला दिला आहे.
‘बिग बॉस मराठी’च्या घराचा कॅप्टन सूरज झाल्याने सर्वत्र आनंदीआनंद आहे. नेटकऱ्यांकडून त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. आजच्या भागात रितेश भाऊदेखील सूरजचं कौतुक करताना आणि त्याला आत्मविश्वास देताना दिसणार आहे. कॅप्टन झाल्यानंतर सूरजने देवाचा आशीर्वाद घेत कॅप्टनच्या रूममध्ये एन्ट्री घेतली होती. “हमारा कॅप्टन कैसा हो, सूरज चव्हाण जैसा हो” असं घरातल्या इतर सदस्यांनी त्याचे कौतुक केले. शिवाय सूरज चव्हाण कॅप्टन झाल्यानंतर सर्व स्पर्धकांनी खास त्याच्यासोबत झापूक झुपूक स्टाईलचा डान्सही केला.
आजच्या दिवसाची खासियत म्हणजे, राज्यासह अवघ्या देशात गणरायाचं आगमन झालं आहे. मुख्य बाब म्हणजे, प्रेक्षकांच्या लाडक्या सीरियल्समध्येही आता गणरायाचं आगमन होत आहे. बिग बॉसच्या घरातलंही वातावरण खूप आनंददायी आहे.