(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
कलर्स मराठीवरील लोकप्रिय रिॲलिटी शो ‘बिग बॉस मराठी’च्या घरात आतापर्यंत घट्ट आणि विश्वासार्ह वाटणारी दिपाली आणि राकेशची मैत्री आता तुटण्याच्या मार्गावर येऊन थांबली आहे. एकमेकांसाठी नेहमी उभे राहणारे, प्रत्येक टास्कमध्ये खांद्याला खांदा लावून खेळणारे हे दोन सदस्य आता थेट एकमेकांसमोर उभे ठाकताना दिसत आहेत. त्यामुळे घरात आणि प्रेक्षकांमध्येही मोठी खळबळ उडाली आहे.
नेमकं असं काय घडलं की ही मैत्री इतक्या टोकाला जाऊन पोहोचली? हे आपण आता जाणून घेणार आहोत. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या प्रोमोमध्ये दिसतंय की एका साध्या मुद्द्यावरून सुरू झालेला वाद हळूहळू गंभीर स्वरूप घेत आहे. चर्चा, आरोप-प्रत्यारोप आणि जुन्या गोष्टी बाहेर येत जातात, ज्यामुळे दोघांमधील दुरावा अधिकच वाढताना दिसतो आहे. समोर आलेल्या प्रोमोमध्ये दिपाली आणि राकेशमध्ये वाद होताना दिसत आहे. आता या प्रोमो व्हिडीओवर चाहते भरभरून प्रतिसाद देत आहेत.
वादाच्या दरम्यान राकेश थेट दिपालीवर आरोप करत म्हणतो की, “रंग बदलताना दिसत आहेत लोकं.” यावर दिपालीही शांत न राहता ठामपणे उत्तर देते. ती म्हणते, “रंग बदलताना मला त्याच दिवशी दिसलं, नॉमिनेशनच्या वेळी.” यानंतर राकेश दिव्याला सपोर्ट करण्याचा मुद्दा मांडतो आणि म्हणतो की तो तिच्या बाजूने उभा राहणार आहे. यावर दिपाली संतप्त होत प्रश्न विचारते, “मी तुझी मैत्रीण नव्हते का? तू neutral राहायला हवं होतंस.”
दिपाली पुढे स्पष्टपणे सांगते की, घरात प्रत्येकजण स्वतःचा खेळ खेळत आहे आणि अशा परिस्थितीत मैत्रीला बाजूला ठेवणं चुकीचं आहे. यावर राकेशही तितक्याच तीव्रतेने प्रतिक्रिया देत “थॅंकलेस असतात लोकं…” असं म्हणतो. या संवादातून दोघांमधील कटुता स्पष्टपणे समोर दिसून येत आहे. या तीव्र वादामुळे बिग बॉसच्या घरातलं वातावरण पूर्णपणे बदलून जातं. इतर घरसदस्यही या वादाकडे लक्ष देताना दिसतात. काही जण दिपालीच्या बाजूने उभे राहतात, तर काही राकेशच्या भूमिकेचं समर्थन करताना दिसणार का, याची उत्सुकता प्रेक्षकांमध्ये वाढली आहे.
दहशत अन् भीतीने भरलेले चेहरे, आणखी एक थरारक कथेची झलक; The Kerala Story 2 चे मोशन पोस्टर रिलीज
आता खरा प्रश्न असा आहे की, ही मैत्री कायमची संपणार की पुन्हा एकदा दोघांमध्ये संवाद होऊन सगळं पूर्वीसारखं होणार? की हा वाद ‘बिग बॉस मराठी’च्या खेळाला आणखी रंगतदार वळण देणार? दिपाली आणि राकेश यांच्यातील हा संघर्ष पुढे कोणतं रूप घेणार, हे पाहणं उत्सुकतेचे ठरणार आहे. तसेच आता ‘बिग बॉस’ च्या भागात पुढे काय घडणार हे जाणून घेण्यास चाहते आतुर आहेत.






