Ajit Pawar Death : आज माझा हा प्रवास इथेच थांबतोय...! अजित पवारांचा अखेरचा निरोप, तो AI जनरेटेड VIDEO पाहून हृदय पिळवटेल (फोटो सौजन्य: नवराष्ट्र टीम)
अजित पवारांच्या निधनाने लोकांचे डोळे भरुन आले असून कोणालाच ते गेल्याचे विश्वास बसत नाहीय. या घटनेने लोक हळहळले आहेत. याच वेळी सोशल मीडियावर अजित पवारांचे आणि त्यांच्या भाषाणाचे काही व्हिडिओ व्हायरल होत आहे. हे व्हिडिओ पाहून लोक एकच म्हणत आहे, दादा इतक्या लवकर जातील हे वाटले नव्हते, दादा परत या.
नुकतेच त्यांच्या पार्थीवावर अंत्यसंस्कार पार पडले आहेत. बारामतीच्या जनतेने आणि महाराष्ट्राने त्यांच्या दादांना अखेरचा निरोप दिला आहे. दरम्यान अजित पवारांच्या राष्ट्रवादी पक्षांच्या कार्यकर्त्यांनी एक एआय जनरेटेड व्हिडिओ शेअर केला आहे. कार्यकर्त्यांनी त्यांना या व्हिडिओतून अजित पवारांना श्रद्धांजली वाहिली आहे. यामध्ये अजित पवार देखील त्यांच्या माणसांचा निरोप घेत आहेत. या शेवटच्या निरोपाचा व्हिडिओ पाहून लोक भारावले आहेत.
या व्हिडिओ अजित दादा म्हणत आहेत, अरे बेट्यांने, इतक्या लवकर मी काय जात नसतो तुम्हाला सोडून. मलाबी अजित पवार म्हणतात. पण गड्यांनो नियतीचा खेळ बघा. खरंच आज माझा हा प्रवास इथेच थांबतोय. मी नेहमी म्हणायचो राजकारण आपल्या जागीय, पण काम महत्वाचं. लोकांनी मला कामाचा माणूस म्हटलं तिच माझ्या आयुष्याची सर्वात मोठी कमाई होती. आज निरोप घेताना मन खूप जड आहे. पण एक समाधान आहे, की शेवटच्या श्वासापर्यंत मी तुमच्यासाठीच धावत होतो. मी तुम्हाला शब्द दिला होता, जोपर्यंत माझे हातपाय चालतात तोपर्यंत मी झटत राहिल. नियती बघा कशी असते, आज माझ्या हक्काच्या बारामतीच्या मातीत तुमच्या सेवेसठी येत असतानाच माझे हात-पाय कामयचे विसावले…
25 दिवसांपूर्वी करण्यात आली होती अजित पवारांच्या मृत्यूची भविष्यवाणी; ज्योतिषाचा तो Video Viral
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.






