Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 28 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Aamir Khan: ‘Love Jihad’च्या आरोपांना आमिरचं सडेतोड प्रत्युत्तर; कुटुंबाचं उदाहरण देत म्हणाला, ‘माझ्या बहिणींनी हिंदू मुलांशी..”

Aamir Khan: गौरी स्प्रॅटसोबतच्या लग्नानंतर 'लव्ह जिहाद'च्या आरोपांना सामोरं जाणाऱ्या आमिर खानने पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली. कुटुंबातील आंतरधर्मीय विवाहांचं उदाहरण देत त्याने आरोप फेटाळले आणि धर्मांतराबाबतही स्पष्ट भूमिका मांडली.

  • By अमृता यादव
Updated On: Jul 15, 2026 | 09:59 AM
(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:

Aamir Khan love Jihad: बॉलिवूड अभिनेता आमिर खान (Aamir Khan)सध्या त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. वयाच्या 61व्या वर्षी त्याने गौरी स्प्रॅटसोबत लग्न केल्यानंतर सोशल मीडियावर त्याच्यावर विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. काही हिंदुत्ववादी संघटनांनी त्याच्यावर ‘लव्ह जिहाद‘चे आरोप केले आहेत. दुसरीकडे, काही मुस्लिम धर्मगुरूंनीही या विवाहावर आक्षेप घेत फतवा जारी केल्याचं वृत्त समोर आलं आहे.

या सर्व आरोपांवर आता आमिर खानने पहिल्यांदाच सविस्तर प्रतिक्रिया दिली आहे. त्याने आपल्या कुटुंबाचं उदाहरण देत आरोप फेटाळून लावले आणि आपल्या कुटुंबाची विचारसरणी नेहमीच सर्वधर्मसमभावाची राहिल्याचं सांगितलं.

वृत्तानुसार, आमिर म्हणाला, “माझ्या दोन्ही बहिणींनी हिंदू मुलांशी लग्न केलं आहे. माझ्या मुलीचंही लग्न हिंदू कुटुंबात झालं आहे. माझा चुलत भाऊ मन्सूर याने ख्रिश्चन महिलेशी विवाह केला आहे. आमच्या कुटुंबात धर्मापेक्षा नात्यांना अधिक महत्त्व दिलं जातं.”

आमिरने पुढे स्पष्ट केलं की, गौरी स्प्रॅट, रीना दत्ता किंवा किरण राव यांपैकी कोणालाही त्याच्याशी लग्न करण्यासाठी धर्मांतर करावं लागलं नाही. त्यांचे विवाह सिव्हिल मॅरेज पद्धतीने झाले असून गौरी ही हिंदू नसून ख्रिश्चन आहे. ती स्वतःच्या धर्माचं पालन करते आणि धर्मांतराचा प्रश्नच उद्भवत नाही, असंही त्याने स्पष्ट केलं.

“तुकाराम मुंढेंकडे शिक्षण खातंही सोपवा”, मराठी अभिनेत्याचं मुख्यमंत्र्यांना थेट आवाहन, म्हणाला, ‘System खऱ्या अर्थाने मुळापासून’

दरम्यान, लग्नानंतर आमिर खान मुंबईतील पाली हिल परिसरात १०० कोटी रुपयांचा आलिशान ‘स्कायव्हिला’ उभारत असल्याच्या चर्चांनाही त्याने पूर्णविराम दिला. अशा वृत्तांचं खंडन करत त्याने सांगितलं की, नवीन बंगला किंवा स्कायव्हिला उभारला जात नसून त्यांच्या सध्याच्या अपार्टमेंट कॉम्प्लेक्सचा पुनर्विकास सुरू आहे. हा निर्णय गृहनिर्माण सोसायटीतील सर्व सदस्यांनी एकमताने घेतला आहे.

Omi Vaidya on Sonam Wangchuk : ‘… ला मरताना पाहायचं नाहीये’ 3 Idiots सिनेमातल्या मराठमोळ्या अभिनेत्याची भावूक साद!

आमिर खानच्या या स्पष्टीकरणानंतर सोशल मीडियावर पुन्हा एकदा चर्चांना उधाण आलं असून, काहींनी त्याच्या भूमिकेचं समर्थन केलं आहे, तर काहींनी त्यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.

Web Title: Aamir khan responds strongly to love jihad allegations says my sisters are married to hindu men

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 15, 2026 | 09:59 AM

Topics:  

  • Aamir Khan
  • Entertainemnt News
  • Love Jihad

संबंधित बातम्या

राम-लक्ष्मणाच्या अतूट बंधाची आठवण करून देणारा ‘बंधू’; उपेंद्र लिमये आणि जितेंद्र जोशी प्रथमच एकत्र
1

राम-लक्ष्मणाच्या अतूट बंधाची आठवण करून देणारा ‘बंधू’; उपेंद्र लिमये आणि जितेंद्र जोशी प्रथमच एकत्र

Dwidha Marathi Movie : ‘द्विधा’ चित्रपटातून उलगडणार भाऊ-बहिणीच्या नात्यातील खास बॉन्डिंग ;’आदि-श्रावणी’ची केमिस्ट्री चर्चेत
2

Dwidha Marathi Movie : ‘द्विधा’ चित्रपटातून उलगडणार भाऊ-बहिणीच्या नात्यातील खास बॉन्डिंग ;’आदि-श्रावणी’ची केमिस्ट्री चर्चेत

Mrityu Chakra Movie: गुरु’ नेमका कोण? पुष्कराज चिरपुटकरच्या भूमिकेने वाढवलं ‘मृत्यूचक्र’चं गूढ
3

Mrityu Chakra Movie: गुरु’ नेमका कोण? पुष्कराज चिरपुटकरच्या भूमिकेने वाढवलं ‘मृत्यूचक्र’चं गूढ

Abhishek Bachchan ETPL: अभिषेक बच्चनने केला European T20 Premier League चा श्रीगणेशा; मैदानावरून शेअर केला खास फोटो
4

Abhishek Bachchan ETPL: अभिषेक बच्चनने केला European T20 Premier League चा श्रीगणेशा; मैदानावरून शेअर केला खास फोटो

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.