(फोटो सौजन्य- Social Media)
आमिर खान हा असा बॉलिवूड स्टार आहे, जो एका वर्षात एकच चित्रपट पडद्यावर आणतो आणि तो सुपरहिट ठरतो, पण गेल्या काही वर्षांपासून या अभिनेत्याचे नशीब त्याला पडद्यावर साथ देत नाही आहे. 2022 मध्ये अमीर खानचा लाल सिंह चड्ढा हा चित्रपट फ्लॉप झाला. या चित्रपटातील गाणी मात्र चाहत्यांना खूप आवडली. याआधी अमीर खान कतरिना कैफसोबत ठग्स ऑफ हिंदोस्तानमध्ये दिसला होता, हा चित्रपटदेखील प्रेक्षकांना फारसा आवडला नव्हता. आमिर केवळ चित्रपटांमध्येच फ्लॉप ठरत नाही तर त्याच्या वैयक्तिक आयुष्यातही तो गेल्या दोन-तीन वर्षांपासून एकटाच आहे. त्याने 2021 मध्ये आपली दुसरी पत्नी किरण रावसोबत घटस्फोटाची घोषणा केली होती. आता त्याने तिसऱ्या लग्नाच्या प्रश्नावर मौन सोडले आहे.
आमिरने तिसऱ्या लग्नाबद्दल सोडले मौन
किरण रावसोबत घटस्फोट घेतल्यानंतर सोशल मीडियावर लोकांनी अंदाज बांधला होता की अभिनेता लवकरच तिसरे लग्न करणार आहे. त्यामुळेच त्याने किरणपासून घटस्फोट घेतला आहे. आता एक वर्षांनंतर त्यांनी लोकांच्या या प्रश्नांची उत्तरे दिली आहेत, जी रिया चक्रवर्तीने तिच्या शोमध्ये अभिनेत्याला विचारली होती. याबद्दल अभिनेत्याने आपले मत स्पष्ट केले आहे.
आमिर खान म्हणाला, लग्न हा एक कॅनव्हास आहे आणि ते कसे रंगवतात हे दोन लोकांवर अवलंबून असते. अशा परिस्थितीत जेव्हा अभिनेत्रीने त्याला विचारले की, ‘तुम्ही पुन्हा लग्न करण्यास तयार होईल का?’ यावर तो म्हणाला, ‘मी आता 59 वर्षांचा आहे, मला वाटत नाही की मी पुन्हा लग्न करू शकेन. मला ते अवघड जात आहे. माझ्या आयुष्यात सध्या अनेक नाती आहेत. माझी मुले आणि माझे भाऊ आणि बहिणींसह मी माझ्या कुटुंबाशी पुन्हा संपर्क साधला आहे. ही नाती मला जपायची आहेत.” असे अभिनेत्याने या मुलाखतीत सांगितले.
हे देखील वाचा- अनिल कपूरच्या ‘हमारा दिल आपके पास है’ चित्रपटाला २४ वर्षे पूर्ण, अभिनेत्याचे ईशा तलवारने केले कौतुक!
मी एक चांगला व्यक्ती बनण्याच्या मार्गावर आहे
या विषयावर रिया आणि आमिर खानचे संभाषण इतके टोकाला गेले की, अभिनेत्री म्हणाली, ‘मी जर आमिर खान वधू शोधत असल्याची जाहिरात केली तर?’ यानंतर अभिनेता म्हणाला, ‘सध्या नाही. माझ्या जवळच्या लोकांसोबत राहून मला खूप आनंद होतो. मी एक आणखी चांगला व्यक्ती बनण्यासाठी काम करत आहे.” असे अमीर खानने या मुलाखतीत सांगितले.