सन ऑफ सरदार, एसएस राजामौली दिग्दर्शित मर्यादा रामण्णा चित्रपटाचा हिंदी रिमेक, 2012 च्या हिट चित्रपटांपैकी एक आहे. अजय देवगण आणि संजय दत्त यांनी कॉमेडी-ॲक्शन ड्रामामध्ये महत्त्वाच्या भूमिका केल्या होत्या. या चित्रपटाचा सीक्वल तब्बल १२ वर्षांनंतर प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. चाहत्यांना हा चित्रपट पाहण्याची आतुरता लागली आहे. या चित्रपटाचे नुकतेच शूटिंगही सुरू झाले आहे.
‘सन ऑफ सरदार 2’ या चित्रपटाबद्दल बऱ्याच दिवसांपासून चर्चा आहे. आज अजय देवगणने सेटवरील एक व्हिडिओ शेअर करून चाहत्यांची मने खुश केली आहेत. बॉलीवूडच्या एका अभिनेत्रीनेही या चित्रपटात प्रवेश केला आहे. सेटवरून या अभिनेत्रीची पहिली झलक समोर आली आहे.
‘सन ऑफ सरदार 2’ चित्रपटाचे शूटिंग झाले सुरु
अजय देवगणने ‘सन ऑफ सरदार 2’ च्या शूटिंगला सुरुवात झाल्याची माहिती सोशल मीडियावर शेअर केली आहे. त्याने सेटवरून मुहूर्त पूजेचा एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. अभिनेत्याने वाहेगुरुच्या आशीर्वादाने शूटिंग सुरू केल्याचे क्लिपमध्ये दिसत आहे. अजय देवगणचा पुतण्या आणि मुलगा युग देखील चित्रपटाच्या सेटवर नजर आले आहेत.
The journey of #SonOfSardaar2 begins with prayers, blessings, and an amazing team🔥🙏#JyotiDeshpande @nrpachisia @talrejapravin @KumarMangat @jiostudios @ADFFilms @danishdevgn pic.twitter.com/ZIrIhyCRcg
— Ajay Devgn (@ajaydevgn) August 6, 2024
या बॉलिवूड अभिनेत्रीची होणार एन्ट्री
सेटवर अजय देवगणची अभिनेत्री हातात क्लॅपबोर्ड घेऊन पोज देताना दिसत आहे. त्याचवेळी चित्रपटाचे दिग्दर्शक विजय कुमार अरोरा शूटिंग करताना दिसत आहेत. मुहूर्ताच्या व्हिडिओमध्ये सर्वात धक्कादायक एन्ट्री होती मृणाल ठाकूरची पाहायला मिळाली आहे. ढोल वाजवताना ती पंजाबी भूमिकेत खूप सुंदर आणि शोभून दिसत आहे. हा संपूर्ण व्हिडिओ डान्स आणि मस्तीने भरलेला दिसून येत आहे. व्हिडिओ शेअर करताना अजय देवगणने कॅप्शनमध्ये लिहिले की, “सन ऑफ सरदार 2″चे शूटिंग सुरु झाले आहे. टीमसाठी प्रार्थना, आशीर्वाद करा.” असे लिहून अभिनेत्याने ही पोस्ट शेअर केली आहे.
हे देखील वाचा- ‘देवरा’ मधील दुसरे गाणं ‘धीरे धीरे’ झाले रिलीज, जान्हवी कपूर आणि ज्युनियर एनटीआर दिसले रोमँटिक!
संजय दत्त नाही आहेत या चित्रपटाचा भाग?
सन ऑफ सरदारमध्ये अजय देवगणसोबत सोनाक्षी सिन्हा, जुही चावला, संजय दत्त, तनुजा आणि अर्जन बाजवा हे कलाकार मुख्य भूमिकेत होते. मात्र, संजय दत्त सन ऑफ सरदार २ चा भाग नसल्याचं बोललं जात आहे. सोनाक्षी सिन्हाही मुहूर्ताच्या व्हिडिओमध्ये दिसली नाही. काही काळापूर्वी मृणालला तिच्या जागी कास्ट करण्यात आल्याची बातमी आली होती आणि हे व्हिडीओ पाहून हे स्पष्ट देखील झाले आहे.