(फोटो सौजन्य-Instagram)
या वर्षी अभिनेत्री जान्हवी कपूरचे दोन चित्रपट प्रदर्शित झाले असून दोन्ही चित्रपटाला चाहत्यांनी चांगला प्रतिसाद दिला आहे. अभिनेता राजकुमार रावसोबतचा तिचा वर्षातील पहिला चित्रपट ‘मिस्टर अँड मिसेस माही’ 31 मे रोजी चित्रपगृहात प्रदर्शित झाला होता. प्रेक्षकांना हा चित्रपट भरपूर आवडला होता. या नंतर अभिनेत्रीचा ‘उलज’ हा दुसरा चित्रपट नुकताच चित्रपटगृहात प्रदर्शित झाला आहे. आणि आता जान्हवी कपूर तिचा ‘देवरा’ हं चित्रपट प्रेक्षकांसाठी घेऊन येण्यासाठी सज्ज झाली आहे.
‘धीरे धीरे’ हे गाणं झाले रिलीज
अभिनेता ज्युनियर एनटीआर आणि जान्हवीचा आगामी चित्रपट ‘देवरा पार्ट 1’ मधील ‘धीरे धीरे’ हे नवीन गाणं प्रेक्षकांच्या भेटीस आले आहे. एनटीआर आणि जान्हवी कपूरची रोमँटिक शैली या गाण्यात पाहायला मिळते आहे. या कपलच्या रोमँटिक स्टाईलने चाहते वेडे झाले आहेत. या दोघांना एकत्र पाहून प्रेक्षकांना आनंद झाला आहे. हे गाणं रिलीज होताच चाहत्यांचा या गाण्याला प्रचंड प्रतिसाद मिळाला आहे.
चार भाषांमध्ये रिलीज झालं हे गाणं
‘धीरे धीरे’ हे गाणं हिंदी व्यतिरिक्त तेलुगू, मल्याळम आणि कन्नड भाषांमध्येही रिलीज झाले आहे. या गाण्याच्या हिंदी आवृत्तीत गायक शिल्पा राव आणि अनिरुद्ध यांनी आपला आवाज दिला आहे. तर हे गाणं वेगवेगळ्या भाषेत रिलीज केल्यामुळे चाहत्यांना या गाण्याचा चांगला अनुभव मिळत आहे.
हे देखील वाचा- ‘देवरा’च्या नवीन पोस्टरमध्ये दिसली जान्हवी कपूर आणि ज्युनियर एनटीआरची रोमँटिक झलक!
कधी होणार चित्रपट प्रदर्शित
जान्हवी कपूर ‘देवरा’ चित्रपटातून साऊथ इंडस्ट्रीत पदार्पण करणार आहे. जान्हवी आणि एनटीआर व्यतिरिक्त या चित्रपटात श्रुती मराठे, प्रकाश राज, श्रीकांत, सैफ अली खान आणि शाइन टॉम चाको देखील दिसणार आहेत. हा चित्रपट 27 सप्टेंबर 2024 रोजी प्रदर्शित होणार आहे. अभिनेत्रीच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, देवरा व्यतिरिक्त तिचे इतर अनेक प्रोजेक्ट्स पाइपलाइनमध्ये आहेत